Elephants Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Animal Crop Damage : भरदिवसा हेवाळेत हत्तींचा धुडगूस

Crop Damage : सिंधुदुर्गनगर जिल्ह्यातील हेवाळे (ता. दोडामार्ग) येथे हत्तींनी धूडगूस घातला असून, भरदिवसा लोकवस्तीत हत्ती आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून नारळ, सुपारी आदींसह इतर पिकांचे नुकसान केले जात आहे..

Team Agrowon

Sindhudurgnagar News : सिंधुदुर्गनगर जिल्ह्यातील हेवाळे (ता. दोडामार्ग) येथे हत्तींनी धूडगूस घातला असून, भरदिवसा लोकवस्तीत हत्ती आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून नारळ, सुपारी आदींसह इतर पिकांचे नुकसान केले जात आहे..

तिलारी खोऱ्यात सहा हत्तींचा वावर गेल्या कित्येक महिन्यांपासून आहे. हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, केर, मोर्ले या गावांमध्ये हत्तींचा वावर असतो. एका गावातून दुसऱ्या गावात अशी या हत्तींची भ्रमंती सुरू असते.

नारळ, सुपारी, नाचणी आणि इतर पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान हत्तींकडून केले जाते. वनविभागाने विविध उपाययोजना केल्या, परंतु त्या सर्व फोल ठरल्या आहेत. दरम्यान, हत्तीच्या कळपाने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हेवाळे गावात धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे

मोठ्या प्रमाणात हत्ती शेतीचे नुकसान करीत असल्याचे चित्र आहे. परंतु आतापर्यंत रात्रीच्या वेळी लोकवस्तीत घुसून नुकसान करणारे हत्ती आता भरदिवसा थेट अंगणापर्यंत आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी (ता. १९) एक हत्ती आणि एक पिलू भरदिवसा एका शेतकऱ्यांच्या घरानजीक आले. घरानजीक प्लॅस्टिक बॅरेलमध्ये ठेवलेले पाणी हत्ती पिताना घरमालकाने पाहिले आणि त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांनी ही माहिती आजूबाजूच्या लोकांना दिल्यानंतर मोठमोठ्याने आवाज करून हत्तीला हुसकावून लावण्यात आले.

दरम्यान, एक हत्ती आणि एक पिलू असे दोनच हत्ती लोकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे उर्वरित चार हत्ती दिसून आले नाहीत. त्यामुळे हत्तींचा कळप विखुरला असावा, अशी शक्यता आहे. तिलारी खोऱ्यात एकूण सहा हत्तींचा कळप वास्तव्यास आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT