Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Theft : महूद परिसरात पाच लाखांची वीजचोरी

Team Agrowon

Solapur News : महूद येथील महावितरण उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महूद, कटफळ, इटकी, खिलारवाडी या गावांमध्ये वीजचोरी शोध मोहीम प्रभावीपणे राबवत सुमारे पाच लाख १० हजार १२० रुपयांची वीजचोरी पकडली असून, यासंदर्भात ३२ जणांवर माळशिरस पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात महावितरणच्या महूद उपविभागाचे सहायक अभियंता बाळकृष्ण खरात यांनी माळशिरस पोलिसांत संबंधित वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महूद येथील महावितरण उपविभागाच्या वतीने या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या महूद, कटफळ, इटकी, खिलारवाडी या गावांमध्ये थकीत वीज बिलामुळे कायमस्वरूपी खंडित केलेल्या कनेक्शनची तपासणी करण्यात आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तपासणी अंतर्गत थकीत वीजबिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित केलेल्या घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांच्या कनेक्शनची तपासणी केली. सहायक अभियंता बाळकृष्ण खरात यांच्यासह महावितरणचे पवनकुमार नेहरकर, योगेश गाडेकर, कर्मचारी सोमनाथ कांबळे, रविराज सावंत, विद्युत सहायक राजेंद्र शिंदे, आदित्य गणगे यांच्या पथकाने संबंधित ग्राहकांच्या घरी जाऊन कनेक्शनची तपासणी केली. वीजबिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडित केला असतानाही या ग्राहकांनी पुन्हा वीजचोरी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यामध्ये महूद येथील महादेव कांबळे, मंगल कांबळे, नितीन माने, बापू सरतापे, कटफळ येथील गजेंद्र दुधाळ, विलास दुधाळ, सदाशिव अनुसे, किरण माने, बापू दुधाळ, भाऊ चव्हाण, सत्यवान सावंत, शंकर हांडे, मधुकर खरात, वर्षा लांडगे, अंबादास हांडे, महादेव सावंत, मंगल धावरे, सुभाष माने, प्रदीप शेळके, बाळासाहेब म्हमाणे, अर्जुन खरात, सविता धनवडे, समाधान साळुंखे, रोहित सोनार, पारूबाई भोसले, इटकी येथील नागनाथ खांडेकर, शहाजी करचे, कालिदास वाघमारे, उज्ज्वला गायकवाड, राम डोंगरे, खिलारवाडी येथील सिद्धेश्वर गाढे, महादेव गळवे अशा ३२ जणांवर वीज चोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक...

एकूण वीज चोरी : २९ हजार ८३८ युनिट

वीज चोरीची रक्कम : चार लाख ४३ हजार १२० रुपये

दंड तडजोड रक्कम -: ६७ हजार

एकूण वीजचोरी : पाच लाख १० हजार १२० रुपये

वीजचोरी गुन्हे दाखल संख्या : महूद-४, कटफळ-२१, इटकी-५, खिलारवाडी-२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT