Electricity Bill Recovery Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill Dues : वीजबिल न भरल्याने अहिल्यानगरच्या हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित

Power Supply Disconnect : वेळेत वीजेचा भरणा केला नसल्याने वीज थकबाकी झाली. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च महिन्यात आतापर्यंत २ हजार ५४५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : वेळेत वीजेचा भरणा केला नसल्याने वीज थकबाकी झाली. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मार्च महिन्यात आतापर्यंत २ हजार ५४५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

आता या ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी वीज देयकांचा भरणा वेळेत करण्याचे आवाहन केले जात आहे.

महावितरणच्या नाशिक परिमंडलातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, पाणीपुरवठा, पथदिवे व इतर वर्गवारीच्या २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे सद्यःस्थितीत जवळपास ३२३ कोटी ६९ लाख रुपये थकबाकी असून, महावितरणची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने ही थकबाकी वसुली करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे.

या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अहिल्यानगर मंडलात माहे मार्च २५ महिन्यात २ हजार ५४५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरू आहे. सदर ग्राहकांना पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करून घ्यायचा असेल तर त्यांना नियमानुसार एकूण थकबाकीसह पुनर्रजोडणी शुल्क भरावे लागणार आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यांतर्गत घरगुती वर्गवारीतील एकूण १ लाख ७५ हजार ग्राहकांकडे १८ कोटी ८४ लाख, वाणिज्यिक वर्गवारीतील १४ हजार ४३९ ग्राहकांकडे ४ कोटी २७ लाख रुपये, औद्योगिक वर्गवारीतील १ हजार ७२२ ग्राहकांकडे २ कोटी ६७ लाख रुपये, पथदिवे वर्गवारीतील ३ हजार ७६८ ग्राहकांकडे २१९ कोटी ६३ लाख, पाणीपुरवठा योजनेतील १ हजार ६७४ ग्राहकांकडे ८२ कोटी ७९ लाख अशी अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण २ लाख १ हजार ९६१ ग्राहकांकडे ३३२ कोटी ६९ लाख रुपये थकबाकी आहे.

ग्राहकांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर मीटर रीडिंग, वीज बिलाचे व इतर आनुषंगिक संदेश दिले जातात, पण तरीही पूर्ण महिना विजेचा वापर केल्यानंतर मिळालेले देयक भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने महावितरणची पथके तयार करण्यात आली असून थकबाकीदार ग्राहकांविरोधात नाइलाजास्तव कठोर पाऊल घेत वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

यासोबतच थकबाकीदार ग्राहकांनी वेळेत देयकांची भरणा न केल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वा ईमेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविली जात आहे.

या नोटीसचा विहित कालावधी संपताच ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित केल्या जाणार आहे. गैरसोय आणि कटू प्रसंग टाळण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या वीज देयकांचा भरणा वेळेत करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT