Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Issue : वीजपुरवठा खंडित केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासणार

Electricity Update : सणाच्या काळामध्ये नगर शहरासह कापड बाजारामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Nagar News : सणाच्या काळामध्ये नगर शहरासह कापड बाजारामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सणाच्या काळात वीजपुरवठा खंडित केल्यास अधीक्षक अभियंत्यांना काळे फासण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी दिला आहे.

दिवाळीच्या खरेदीनिमित्त जिल्हाभरातून नागरिक शहरात येत आहेत. कापड बाजारामध्ये आधीच मंदीचे दिवस आहेत. त्यात वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने त्याचा खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे.

त्यामुळे सणाच्या काळात शहरातील वीजपुरवठा खंडित करू नका, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे अधीक्षक अभियंत्यांना काळे फासणार असल्याचा इशारा खोसे यांनी दिला.

अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी किरण व्होरा,श्याम देडगावकर, प्रकाश बायड, दीपक नवलानी, राहुल मुथा, प्रतीक बोगावात, अभय गांधी, श्यामभाऊ काथेड, सोनू भटेजा, सुमित कुलकर्णी, गजेंद्र भांडवलकर, सोमा तांबे, शुभम टाक आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT