Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill : खेडमधील १९ हजार शेतकऱ्यांचे वीजबिल झाले माफ

Electricity Bill Waived : मुख्यमंत्री बळीराजा वीस सवलत योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ केली आहे.

Team Agrowon

Khed News : मुख्यमंत्री बळीराजा वीस सवलत योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ केली आहे. या योजनेचा खेड तालुक्यातील १९ हजार ५३९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून या शेतकऱ्यांना कृषी पंपाची शून्य वीजबिलाची प्रत मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा विद्युत नियंत्रण समिती सदस्य रवींद्र गायकवाड यांनी दिली.

राज्य शासनाने वीज सवलत योजनेअंतर्गत राज्याचे शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या भूकंपाचे वीजबिल माफ करून लाडक्या शेतकरी भावाला मदत केली आहे. तालुक्यातील या सर्व शेतकऱ्यांची मिळून १४ कोटी २३ लाख रुपयांची वीज माफ झाले आहे. तालुक्यातील तीन उपविभागांतर्गत ११ क्षेत्रीय उपविभागातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे.

यामध्ये चाकण एमआयडीसी उपविभागीय १ अंतर्गत चाकण ग्रामीण वसुली सेक्शनमधील २३३९ शेतकऱ्यांना२ कोटी, चाकण एमआयडीसी उपविभाग दोन अंतर्गत आळंदी ग्रामीण आळंदी शहर, भोसे व चाकण शहर सेक्शनमधील ५७५६ शेतकऱ्यांना ४ कोटी ७२ लाख तर राजगुरुनगर उपविभागांतर्गत चास, कडुस, पाईट, वाडा व राजगुरुनगर ग्रामीण १, राजगुरुनगर ग्रामीण २ तसेच राजगुरुनगर शहर सेक्शनमधील ११४४ शेतकऱ्यांना ७ कोटी ५१ लाखांचा लाभ मिळाला आहे.

लाभधारक शेतकऱ्यांमध्ये सर्वांत जास्त सहभाग राजगुरुनगर ग्रामीण, भोसरी व चाकण तसेच ग्रामीण सेक्शनमधील शेतकऱ्यांचा असल्याचे रवींद्र गायकवाड यांनी सांगितले. या शेतकऱ्यांना महावितरणाच्या वतीने शून्य वीज बिल असलेली बिलांची प्रत वितरित करण्यात येत आहे. शून्य वीजबिलाची प्रत मिळाल्यानंतर कडूसच्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Loan Scheme: पशुपालकांना ३ लाखांपर्यंत विनातारण बिनव्याजी कर्ज

Lek Ladki Yojana: ‘लेक लाडकी’ योजनेत नऊ हजारांहून अधिक मुलींना लाभ

Pune Road Development: पुणे जिल्ह्यातील अडीचशे रस्ते होणार सुसाट

Farmer ID: वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक

Shaktipeeth Highway Project: ‘शक्तिपीठ’साठी अट्टहास धरू नका, तो रद्द करा : सतेज पाटील

SCROLL FOR NEXT