Co operative Societies Election agrowon
ॲग्रो विशेष

Co-Operative Election : पुढील वर्षात सहकारातील ६६ संस्थाच्या निवडणुका

Co-Operative Sector Maharashtra : वर्षभरात सहकारातील १५१ संस्थाच्या निवडणुका डोक्यावर असताना पुढील वर्षात ६६ संस्थांच्या निवडणुकांचीही जबाबदारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर येणार आहे.

Team Agrowon

Amaravati News : वर्षभरात सहकारातील १५१ संस्थाच्या निवडणुका डोक्यावर असताना पुढील वर्षात ६६ संस्थांच्या निवडणुकांचीही जबाबदारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर येणार आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या दरम्यान ६६ संस्थांची मुदत संपणार आहे. त्यामुळे मुदत संपताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणुका घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात या वर्षात क वर्गातील २६, ब वर्गातील ३७ व ड वर्गातील ८८ अशा १५१ सहकारातील संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.

यामध्ये सेवा सहकारी संस्थांसह पतसंस्था, संघटना, पणन, औद्योगिक संस्था, रुग्णालय संस्था आदी विविध सहकारातील संस्थांचा समावेश असून या निवडणुकांना सलग चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

आधी लोकसभा, त्यानंतर पावसाळा आणि आता विधानसभा निवडणुकांमुळे या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती आहे. परंतु विधानसभा निवडणुका संपल्याने कोणत्याही क्षणी निवडणुकांवरील स्थगिती उठवून त्याची प्रक्रिया सुरू होण्याच्या शक्यतेने रखडलेल्या निवडणुकांच्या तयारीला उपजिल्हानिबंधक कार्यालय लागले आहे.

अशातच पुढील वर्षामध्ये देखील ब वर्गातील ६, क वर्गातील ३४ आणि ड वर्गातील २६ अशा ६६ विविध संस्थांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

त्यामुळे टप्प्याटप्प्याने या संस्थांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. यामध्ये सेवा सहकारी, नोकरदार, पतसंस्था, नागरी संस्था, पाणी वापर आदी विविध संस्थांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT