APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon APMC Election : जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हालचाली

निवडणुकीसंबंधी आचारसंहितादेखील लागू केली जाईल. यापूर्वी या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केली जात नव्हती.

Team Agrowon

Jalgaon APMC Election News : जिल्ह्यातील ११ बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी (APMC Eelction) नेते, विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांत हालचाली सुरू झाल्या आहेत. एप्रिलमध्ये या निवडणुका होतील. २३ मार्च रोजी मतदार याद्या सर्वत्र प्रसिद्ध होतील.

निवडणुकीसंबंधी आचारसंहितादेखील लागू केली जाईल. यापूर्वी या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू केली जात नव्हती. उमेदवारदेखील सोसायटी किंवा ग्रामपंचायतीचा सदस्य (Gram Panchayat Member) असावा, हादेखील निकष राहिलेला नाही.

शेतकरी या निवडणुकीत आपली उमेदवारी दाखल करू शकतील. यामुळे निवडणुकीत चुरस राहील. इच्छुकांची संख्यादेखील मोठी राहील.

एप्रिलमध्ये या निवडणुका होतील. त्यापूर्वीच राजकीय मंडळी, शेतकऱ्यांमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. राज्यात सत्तांतरानंतर या निवडणुकीची समीकरणेदेखील बदलणार आहेत.

जळगाव बाजार समितीमध्ये मागील वेळेस सेना-भाजप व काँग्रेसचे पॅनेल होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील नाराज आणि सेनेतील नाराज, इतर नेत्यांनी एका पॅनेलची स्थापना केली होती.

सेना-भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे व शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केले होते. पण आता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

यामुळे या वेळेस खडसे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव देवकर, शिवसेनेतील नाराज मंडळीचे एक पॅनेल राहील, असे संकेत आहेत. दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) व भाजपचे एक पॅनेल असेल. या वेळेस निवडणुकीत चांगला रंग भरेल, असेही दिसत आहे.

जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीबाबत नेत्यांनी कुठलीही चर्चा केलेली नाही. परंतु आमचे नेते गुलाबराव पाटील जे निश्‍चित करतील, त्यानुसार आम्ही काम करू. नेत्यांनी निश्‍चित केलेल्या उमेदवारांना निवडून आणू. शेतकरी हितार्थ कामकाज हाच अजेंडा घेऊन आमचे नेते कार्यवाही करतात.
कैलास चौधरी, माजी सभापती, जळगाव बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT