Election Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik APMC Election : नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समितीचे बिगूल

बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत २८ व ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदानानंतर पुढील तीन दिवसात मतमोजणी होईल.

Team Agrowon

Nashik Election News : जिल्ह्यातील १४ बाजार समितीच्या निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर मंगळवारी (ता. २१) सहकार प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.

त्यानुसार बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत २८ व ३० एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतदानानंतर पुढील तीन दिवसात मतमोजणी होईल.

२७ मार्च पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होईल. ३ एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे.

या मध्ये जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, नाशिक, लासलगाव, घोटी, येवला, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव अशा चौदा बाजार समित्यांचा समावेश आहे. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात येऊन तब्बल २० महिन्यांचा कालावधी उलटला होता. राज्यात सत्तांतर झाले त्यानंतर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना उमेदवारी, मतदानाचा अधिकार देण्याची भूमिका सरकारने घेतली होती.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

२७ मार्च २०२३ - निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे

२७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ - नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी

५ एप्रिल २०२३ - नामनिर्देशनपत्रांच्या छाननीची तारीख

६ एप्रिल २०२३ - छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीची तारीख

६ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ - उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी

२८ व ३० एप्रिल२०२३- मतदान

मतदान तारखेपासून तीन दिवसांच्या आत मतमोजणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT