Bhalchandra Anand Sathe Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : पालवी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Cashew Production :

शेतकरी नियोजन

पीक : काजू

शेतकरी : भालचंद्र अनंत साठे

गाव : भुईबावडा, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र : दहा एकर

काजू लागवड : साडेनऊ एकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा (ता. वैभववाडी) येथे १० एकर जमीन आहे. यातील सुमारे साडेनऊ एकरमध्ये वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सात जातीच्या काजूची ८०० कलमे आहेत. सध्या बागेत तणनियंत्रणाचे काम सुरू असून दुसऱ्या टप्प्यात सेंद्रिय खतांच्या मात्रा देण्याचे काम देखील केले आहे.

व्यवस्थापनातील बाबी

यावर्षी मार्चपासून काजू बी जमिनीवर पडण्यास सुरवात झाली. जमिनीवर पडलेले काजू बी गोळा करून घेतले. त्यानंतर गोळा केलेले काजू बी स्वच्छ पाण्याने धुवून त्यास हलके उन्ह दिले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात आलेल्या मोहोरापासून उत्पादन सुरू झाले.

मे महिन्यात कलमांखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून बुंध्यावर रचून घेतला.

जूनमध्ये बागेत रासायनिक, सेंद्रिय आणि शेणखत असे संतुलित खत व्यवस्थापन करण्यावर भर दिला जातो. कलमांचे वय आणि विस्तार लक्षात घेऊन कलमांच्या भोवती चर खोदून खतमात्रा दिली.

जुलै महिन्यात पावसाची तीव्रता जास्त होती. त्यामुळे बागेत कोणतीही कामे करता आली नाहीत. ऑगस्ट महिन्यातही पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कामे करता आली नाहीत.

पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यासाठी ऑगस्ट अखेरीस तणनाशक फवारणी केली. फवारणी करतेवेळी कलमांच्या फांद्यांवर तणनाशकाचे द्रावण पडणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली.

या आठवड्यात तणनाशक फवारणीनंतर काय स्थिती आहे याची पाहणी केली जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार ग्रासकटरने पुन्हा तण नियंत्रण केले जाईल. बांधावर वाढलेली लहान झुडपे देखील काढून टाकण्याचे नियोजित आहे.

आगामी नियोजन

पुढील आठवड्यात पावसाची तीव्रता पाहून सेंद्रिय खतांची दुसरी मात्रा दिली जाईल.

या महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या सुरूवातीस कलमांना पालवी येण्यास सुरुवात होईल. या काळात बागेत टी मॉस्किटो बग आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव जाणवतो. किडींच्या प्रादुर्भावासाठी प्रत्येक कलमाचे व्यवस्थित निरीक्षण केले जाईल. त्यानंतर रासायनिक फवारणीचे घेणार आहे. कलमांना आलेली पालवी टिकवून ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल.

ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कलमांना मोहोर येण्यास सुरवात होते. कलमांना पूर्ण मोहोर आल्यानंतर पुन्हा बागेची पाहणी केली जाईल. त्यानंतर शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांची दुसरी फवारणी घेतली जाईल. जेणेकरून मोहोर टिकून राहील.

या कालावधीत धुक्याचे प्रमाण अधिक असल्याने बुरशीजन्य रोगांचा तसेच फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यासाठी रासायनिक फवारणी घेतली जाईल.

काजू कलमांना फळधारणा झाल्यानंतर बागेचे निरीक्षण केले जाईल. कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास आवश्यकतेनुसार रासायनिक घटकांची फवारणी घेतली जाईल.

नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये बागेभोवतीचे माळरानावरील गवत सुकण्यास सुरवात होते. त्यामुळे वणवे लागतात. त्यासाठी बागेभोवती आगरेषा काढली जाईल. कुंपणालगतच्या जागेतील पालापाचोळा गोळा करून संपूर्ण जागा स्वच्छ केली जाईल.

भालचंद्र साठे, ७९७२१६५२६५

(शब्दांकन : एकनाथ पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk Cocoon Production : आरक्षणासाठी बीड बंद! बाजार समितीही बंद असल्याने १० ते १२ टन रेशीम कोष शेतावरच अडकला

Jayakawadi Water Storage : जायकवाडीचा पाणीसाठा स्थिर; प्रकल्प जवळपास तुडुंबच

Mango Management : अतिघन बागेत उत्तम बहरासाठीचे तंत्र

Paddy MSP : झारखंड सरकारचा शेतकऱ्यांसाठी निर्णय; एमएसपी व्यतिरिक्त, धानावर प्रति क्विंटल १०० रुपये बोनस

Agriculture Sector Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात झपाट्याने घट, पाच लाख शेतकरी अत्यल्प भूधारक

SCROLL FOR NEXT