MLA Subhash Deshmukh Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : दक्षिण सोलापुरातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न

MLA Subhash Deshmukh : सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सीना-भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सीना-भीमा जोडकालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

Team Agrowon

Solapur News : दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ अठरा टक्के सिंचन क्षेत्र आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे गरजेचे आहे.

यासाठी तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सीना-भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, सीना-भीमा जोडकालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत, असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

राजूर येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून ९ कोटी खर्चातून सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचे तसेच इतर दीड कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती डॅा.चनगोंडा हविनाळे, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, महिला तालुकाध्यक्ष अंबिका पाटील,

हनुमंत कुलकर्णी, मळसिध्द मुगळे, यतीन शहा, संदीप टेळे, सरपंच लक्ष्मण गडदे, राधाकृष्ण पाटील, उमेश मळेवाडी, प्रा. विजयकुमार बिराजदार, उपसरपंच सतीश देवकते, धर्मराज बळ्ळारी, हनुमंतराव राजूर येथे बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, सिध्दाराम ढंगापुरे, अभिमन्यू पाटील, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.

हनुमंत कुलकर्णी, मळसिध्द मुगळे, यतीन शहा, संदीप टेळे, सरपंच लक्ष्मण गडदे, राधाकृष्ण पाटील, उमेश मळेवाडी, प्रा. विजयकुमार बिराजदार, उपसरपंच सतीश देवकते, धर्मराज बळ्ळारी, हनुमंतराव राजूर येथे बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, सिध्दाराम ढंगापुरे, अभिमन्यू पाटील, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर पाटील आदी उपस्थित होते.

आमदार देशमुख म्हणाले, मागणी नसतानाही आपण भीमा-सीना नदी एकमेकांना जोडून दोन्ही नद्या बारमाही करण्यासाठी जोडकालवा प्रकल्प हाती घेतला आहे. वडापूर, वडकबाळ येथे बॅरेजस बांधणार आहोत. तसेच इतर ठिकाणी बंधारे कशी बांधता येतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वरील सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास तालुक्यातील सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढेल, त्यामुळे तालुक्यात हरितक्रांती होईल.असेही ते म्हणाले. यावेळी शेळके म्हणाले, आमदार देशमुख तालुक्याचा विकास साधत आहेत, चांगल्या कामाला सर्वांनीच पक्ष न पाहता सहकार्य करावे, आपले चांगल्या कामाला नेहमीच सहकार्य राहील, माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी तालुक्यात विकासाचे राजकारण केले, तसेच काम देशमुख तालुक्यात करीत आहेत. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी करून आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT