Onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Management : कांदा पिकात खते देण्यासह तणनियंत्रणास वेग

Fertilizer Management : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड स्थिर आहे. पिकात सध्या खते देण्यासह तणनियंत्रणाची कार्यवाही गतीने सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात उन्हाळ किंवा रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड स्थिर आहे. पिकात सध्या खते देण्यासह तणनियंत्रणाची कार्यवाही गतीने सुरू आहे. कांदा लागवड या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होती. सध्या अपवादानेच लागवड सुरू आहे. उशिराची लागवड शेतकरी टाळतात. कारण पुढे काढणीला विलंब होतो.

काढणी पावसाळ्यात सुरू होते. तसेच वळवाचा पाऊस, वादळी पाऊस अशा समस्या मे मध्ये तयार होतात. यामुळे अनेकांनी लागवड डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण केली आहे. कांदा पिकाची लागवड खानदेशात सर्वत्र झाली आहे. काही कंपन्यांनीदेखील करार पद्धतीने पांढऱ्या कांद्याची लागवड केली आहे. कांदा पिकासाठी खानदेशातील धुळे जिल्हा आघाडीवर आहे.

धुळ्यात खरिपासह रब्बीतील कांदा पीक खानदेशात अधिक असते. या पाठोपाठ जळगावात कांदा लागवड झाली आहे. कांदा पिकाचे खरिपात अतिपावसात नुकसान झाले. यामुळे अनेकांनी रब्बीत लागवड टाळली. परंतु काहींनी कांदा दर टिकून असल्याने कांदा लागवड केली आहे.

यामुळे खानदेशात कांद्याखालील क्षेत्र स्थिर आहे. कांदा लागवड धुळ्यात सुमारे सात हजार हेक्टरवर, जळगावात पाच हजार हेक्टरवर आणि नंदुरबारमध्ये सुमारे दीड हजार हेक्टरवर झाली आहे. यंदा १४ हजार हेक्टरवर कांदा लागवड अपेक्षित आहे.

कांदा बियाणे यंदा महाग असल्याने लागवड खर्च वाढला आहे. कांदा पीक वाढीच्या अवस्थेत असून, त्यात ढगाळ, पावसाळी वातावरण वारंवार तयार होत आहे. यामुळे पिकात रोगराई येत आहे. त्यात रसशोषक किडी, अळ्यांची समस्या येत आहे. बुरशीजन्य रोगही सक्रिय होण्याची भीती आहे. यामुळे शेतकरी पिकात फवारणी घेत आहेत. तसेच तण वाढल्याने किडी येतात. त्यात तणनियंत्रणाचे कामही गतीने सुरू आहे.

तणाची समस्या यंदा अधिक दिसत आहे. कारण मध्यंतरी पाऊस झाला. तणनियंत्रणासाठी काही शेतकरी तणनाशकांचा उपयोग करीत आहेत. तर काही शेतकरी मजुरांकरवी तण काढून घेत आहेत. खतेही दिली जात आहेत. पहिला बेसल डोस दिल्यानंतर दुसरा बेसल डोसही दिला जात आहे. त्यात संयुक्त खतांचा उपयोग शेतकरी करीत आहेत. कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी नीरभ्र वातावरणाची गरज आहे. परंतु नीरभ्र वातावरण नसल्याने अडचणी येत आहेत.

डिसेंबरमध्ये सर्वाधिक लागवड

खानदेशात कांद्याची लागवड डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कांदा लागवड सुरूच होती. रब्बीत कांद्याखालील क्षेत्र दर आठवड्याला वाढत गेले. सर्वाधिक कांदा लागवड डिसेंबरमध्ये झाली आहे. लाल कांद्याची लागवड खानदेशात अधिक आहे. पांढऱ्या कांद्याची लागवड नंदुरबार, धुळे व जळगावातील काही भागांत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT