Vegetable Market agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : उन्हाचा तडाख्यात भाजीपाला पिकावर परिणाम, भाज्यांच्या दरात वाढ

Watermelon Rate : कलिंगडची आवक मंदावल्याने दरही वाढले आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला.

sandeep Shirguppe

Summer Heat : उन्हाचा तडाखा वाढल्याचा थेट परिणाम शेतमालावर होत आहे. पाटबंधारे विभागाकडून पाण्याच्या नियोजनासाठी उपसाबंदी लावल्याने अनेक ठिकाणी भाजीपाल्याची पिके वाळण्याची शक्यता आहे. दरम्यान काही ठिकाणी भाजीपाला वाळल्याने बाजारातील आवक कमी झाली आहे.

मेथी, पोकळा, कोथिंबीरचे दरात किंचीत वाढ झाली आहे. तर फळभाज्यांचीही आवक मंदावली आहे, फळांचे दर किलोमागे वाढले आहेत. कलिंगडची आवक मंदावल्याने दरही वाढले आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्याने त्याचा बाजारावर परिणाम झाला.

भाजीपाल्याचे दर

मेथी पेंडी - २५ ते ३० रुपये पेंडी, पालक १५, पोकळा १५ ते २०, अंबाडा १०, पालक- १० ते १५, करडा- २०, तांदळी १५, कोथिंबीर २५ ते ३५, कांदापात- २० रुपये.

फळभाज्यांचे किलोचे दर

टोमॅटो १० ते २० रुपये, वांगी ८०, कारली ४० ते ६० फ्लॉवर- २० ते ४०, कोबी १५ ते २५, ढोबळी मिरची - ६० ते ८०, गवार (देशी)- ८० ते १००, गाजर ४०, बीन्स २५०, वरणा ८०, काकडी (देशी) ५०, काकडी (काटेरी) ४० ते ६०, शेवगा ५ नग १०, लिंबू २ नग १०, दुधीभोपळा- १० ते २० रुपये नग, बीट ५ रुपये नग, मका कणीस ५ रुपये नग, स्वीटकॉर्न ७ ते १० रुपये नग, कांदा- २० ते ३० रुपये किलो.

फळांचे दर

रत्नागिरी हापूस ५ डझन पेटी- १२०० ते २५०० रुपये, देवगड हापूस- २०० ते ४०० रुपये डझन, तोतापुरी- ५ ते २० रुपये नग, पायरी १५०० रुपये पाच डझन पेटी, सफरचंद २०० ते ४०० रुपये, संत्री १०० ते १४० रुपये डाळींब १२५ ते २०० रुपये, चिकू ५० ते ९० रुपये, पेरू ६० ते १०० रुपये कलिंगड ४० ते १०० रुपये नग.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेच्या दरात वाढ

US Soybean Production: अमेरिकेत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज

Monsoon Rain Forecast: राज्यात जोरदार पावसाचा अंदाज कायम

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

SCROLL FOR NEXT