Mahogani Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Mahogani Cultivation : महोगणी लागवडीतून आर्थिक मिळकत

Mahogani Crop : राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने महोगणी वनशेती व्यवस्थापनाबाबत नुकतीच बारामती येथे कार्यशाळा पार पडली.

Team Agrowon

Pune News : राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने महोगणी वनशेती व्यवस्थापनाबाबत नुकतीच बारामती येथे कार्यशाळा पार पडली.

कार्यशाळेचे मुख्य अतिथी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सामी रेड्डी म्हणाले, की खराब जमिनीच्या सुधारणेसाठी कृषी वनीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी महोगणी लागवडीतून आर्थिक मिळकत होऊ शकते.

(ॲग्रो विशेष)

कार्यशाळेमध्ये डॉ. संग्राम चव्हाण यांनी महोगणी लागवड आणि व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. मिटकॉन संस्थेच्या हवामान बदल आणि शाश्वत विभागाचे उपाध्यक्ष डॉ. अतुल आयरे यांनी हवामान बदल कमी करण्यासाठी कृषी वनीकरणाबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये विशेष अतिथी म्हणून उप वनसंरक्षक (वन्यजीव) तुषार चव्हाण यांनी कृषी वनीकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यशाळेमध्ये महोगनीच्या वैज्ञानिक छाटणी तंत्र आणि महोगणी वनशेती या तांत्रिक माहितीपत्रकांचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यशाळेनंतर तज्ज्ञांनी अंजनगाव येथील महोगणी लागवड प्रक्षेत्रामध्ये पीक व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत संस्थेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमृत मोराडे यांनी आणि डॉ. विजय काकडे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Subsidy: 'रब्बी'साठी स्फुरद, पालाशयुक्त खतांच्या अनुदान रकमेत वाढ; 'डीएपी'ची पिशवी १,३५० रुपयांनाच

Farmer Government Schemes: जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारी योजनांचा लाभ मिळणार, सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Agrowon Diwali Article: ‘कृषिगती’चा इलेक्ट्रिक साथी’

Agrowon Diwali Article: गावकुसातील तरुण ‘क्रिएटर्स’

Soil Mulching: जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी आच्छादन करताना काय काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT