Barku Ughade Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Cultivation : फळबाग लागवडीतून साधली आर्थिक उन्नती

Agriculture Award Announced : बारकू उघडे यांच्या प्रयोग व उपक्रम शेतीची दखल घेत सरकारने शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Amberanth News : पिंपळोली गावातील आदिवासी शेतकरी बारकू उघडे वयाच्या पंचाहत्तरीतही दहा एकर जागेत भातशेती करण्याबरोबरच भाजीपाला, फळबाग, साग आणि आंबा यांच्या लागवडीद्वारे विविध प्रकारचे उत्पादन घेत आहेत. बारकू उघडे यांच्या प्रयोग व उपक्रम शेतीची दखल घेत सरकारने शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

शेतीसाठी आवश्यक पाण्याची सोय नसल्याने खरीप हंगामात भात, नाचणीची शेती करत असत. खरीप हंगाम संपल्यावर मिळेल तेथे मजुरीसाठी जायचे, असा बारकू उघडे यांचा नित्यक्रम अनेक वर्षे ठरलेला होता; मात्र मिळणाऱ्या मजुरीवर संसाराची घडी नीट बसत नव्हती.

घरी मोठ्या प्रमाणात असलेल्या शेतीच्या माध्यमातून जास्तीचे उत्पन्न घेऊ शकतो, ही बाब लक्षात येताच बारकू उघडे यांची पावले शेतीकडे वळली. पावसाळ्याच्या मोसमात भातशेती झाल्यावर पाटाच्या पाण्यावर वनराई बंधाराच्या साहाय्याने पाणी अडवून त्यांनी १९८० मध्ये भाजीपाला लागवडीला सुरुवात केली.

उघडे यांच्याप्रमाणे भागातील अन्य काही शेतकरी बांधवांनी एकत्रित वांगी, मिरची, काकडी, कारली, शिराळी भाजी लागवड सुरू केली. त्यामुळे कल्याण आणि बदलापूर परिसरातील व्यापारी पिंपळोली गावात येऊन भाजीपाला खरेदी करू लागले. उघडे यांनी कृषी विभागाच्या मदतीने नव्या भात लागवड पद्धती समजावून घेतल्या. सुधारित नवीन बियाणे परिसरात उपलब्ध होत नव्हते.

त्यावेळी त्यांनी कर्जत संशोधन केंद्रात जाऊन बियाणे आणून त्याची लागवड केली. तसेच उत्पादन झालेले बियाणे उघडे दुसऱ्या वर्षी गावातील इतर शेतकऱ्यांना देत असत. भाजीपाल्यानंतर फळबाग लागवडीकडे बारकू उघडे यांनी लक्ष केंद्रित केले. गावात आंबा लागवडीचा पहिला प्रयोग त्यांनी केला. तो प्रयोग यशस्वीही करून दाखवला.

कुटुंबीयांचे सहकार्य

शेतीच्या बांधावर तूर लागवड, तृणधान्य वर्षे साजरे होत असताना नाचणी, वरई, साग लागवड केली आहे. एकात्मिक पद्धतीने शेती करण्यावर बारकू उघडे यांचा जास्त भर आहे. शेतीच्या कामात कुटुंबातील मुले, सुना, नातवंडे याशिवाय कृषी खात्याचे अधिकारी सचिन तोरवे, अविनाश वडते यांचे सहकार्य उघडे यांना मिळाले.

लोकनाथ भाताला मागणी

आजही त्यांच्या शेतात हापूस, नीलम आणि तोतापुरी आंब्याचे पीक दरवर्षी घेतले जाते. भातशेतीमध्ये लोकनाथ आणि कर्जत - ९११चे उत्पादन घेतले. यात लोकनाथ भाताला जास्त मागणी असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT