ECI guidelines on disabilities Agrowon
ॲग्रो विशेष

ECI guidelines on disabilities : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकारण्यांना कानपिचक्या

ECI guidelines to political : दिव्यांग असणाऱ्या लोकांबाबत अनादर टाळण्यासाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने पावले उचलली आहे. तसेच आयोगाने थेट राजकीय पक्षांनाच याबाबत नव्या सुचना जारी केल्या आहेत.

Aslam Abdul Shanedivan

New Delhi News : नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणूका पार पडल्या. यात तीन ठिकाणी भाजपला तर एका ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले. तसेच येत्या काळात देशात लोकसभा निवडणूका देखील होणार आहेत. त्याआधी आता केंद्रीय निवडणूक आयोगाने थेट राजकीय पक्षांनाच सुचना देताना दिव्यांगांवरून मार्गदर्शक तत्त्वं जारी केली आहेत. याद्वारे आयोगाने दिव्यांगांना अपमानास्पद वाटेल असे शब्द वापरण्यास सक्त मनाई केली आहे.

आयोगाने याबाबत आपल्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. ज्यात, राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना सार्वजनिक भाषणांमध्ये दिव्यांगांसाठी 'अपमानास्पद शब्द' वापरू नयेत, असे निर्देश दिले आहेत. तसेच राजकीय पक्षांनी त्यांच्या वेबसाइट, सोशल मीडियासह त्यांच्या भाषणात आदरार्थि शब्द वापरावेत अशा सूचना दिल्या आहेत.

तसेच मार्गदर्शक तत्वांबरोबरच आयोगाने दिव्यांग हक्क कायदा, 2016 तील कलम 92 चा उल्लेख केला आहे. त्या कलमानुसार जर दिव्यांगाबाबत अपशब्द वापरला तर अंतर्गत 5 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते असेही आयोगाने म्हटलं आहे.

मुका, मतिमंद, वेडा, सरफिरा, आंधळा, काना, बहिरा, लंगडा, अशक्त, अपंग असे शब्द राजकीय पक्षांनी किंवा नेत्यांनी आपल्या भाषणात वापरू नयेत. अशा शब्दांमुळे त्यांचा अपमान होतो असे स्पष्ट केलं आहे

दिव्यांगांचं प्रशिक्षण मॉड्युल

दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी कठोर शब्दात मार्गदर्शक सुचना करताना आयोगाने राजकीय पक्षांनी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिव्यांगांचं प्रशिक्षण मॉड्युल द्यावे अशाही सुचना आयोगाने केल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT