Sugarcane Farmer Desperate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer Desperate : भुईमुगावर हुमणी, सोयाबीनवर लष्करी अळी तर उसावर पाने कुरतणारी कीड, शेतकरी बेजार

Crop Damage Disease : नदीकाठी असणाऱ्या ऊस, सोयाबीन, भुईमूग, भात या पिकांना जाग्यावर जलसमाधी मिळाली आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmers : अतिवृष्टी व महापुरातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोच भुईमुगावर हुमणी तर सोयाबीनवर लष्करी अळी आणि उसावर पाने कुरतडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा हतबल बनला आहे. महापूर ओसरल्यानंतर उरलं सुरलेलं पीक वाचवताना शेतकरी धावपळ करत आहे परंतु पिकांवर किडीचा मारा होत असल्याने काय करायचं हाच प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे.

नदीकाठचे संपूर्ण ऊस, सोयाबीन, भुईमूग पीक कुजले असून शिल्लक राहिलेल्‍या माळरानावरील सोयाबीन, भुईमूग पिकांना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.

गेल्या आठवड्यात महापुराचे पाणी सोळा दिवसांनी नदीपात्रात परतले. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या ऊस, सोयाबीन, भुईमूग, भात या पिकांना जाग्यावर जलसमाधी मिळाली आहे. यासाठी शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

शासनाकडून बाधित पिकांना किती भरपाई देणार, हे अद्यापही जाहीर केलेले नाही. हे संकट थांबते ना थांबते तोच उरलेल्या क्षेत्रातील भुईमूग, सोयाबीन पिकांना विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षी शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईची रक्कम जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

भुईमुगाचे क्षेत्रातील जमिनीखाली हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाणार असल्याने हाती पीक येणं कठीण झालं आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT