Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : माळशिरस तालुक्यात ११ हजार २१२ हेक्टरवर खरीप पेरणी

Kharif Season 2025 : यंदा लवकरच खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. बियाणे व खतांची उपलब्धता बाजारात झाली आहे. ११ हजार २१२ हेक्टरवर पेरणी होणार आहे.

Team Agrowon

Solapur News : माळशिरस तालुक्यात सलग आठ दिवस दररोज सरासरी १६.३ मिलिमीटर पाऊस झालेला असून आजपर्यंत १८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा लवकरच खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. बियाणे व खतांची उपलब्धता बाजारात झाली आहे. ११ हजार २१२ हेक्टरवर पेरणी होणार आहे.

माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर, माळशिरस, सदाशिवनगर, दहिगाव, नातेपुते, अकलूज, लवंग, महाळुंग, वेळापूर, पिलीव या सर्व मंडळांमध्ये पाऊस झाला. या अवकाळी पावसाचे रूपांतर पावसाळ्यात झाले असून याचा सर्वात जास्त फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होणार आहे.

खरीप हंगामाच्या पेरण्यांना हा पाऊस उपयोगी ठरलेला आहे. तसेच शेतातील उभ्या पिकांना विशेषतः जनावरांच्या हिरव्या चाऱ्या पिकास, ऊस पिकाला, केळीला याचा सर्वांत जास्त फायदा झालेला आहे. अपवाद फक्त आंबा पीक आहे.

आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या पावसामुळे आंबा व्यापारी आणि आंबा उत्पादक या दोघांनाही मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. मात्र आंब्याचे बाजारपेठेत दर उतरल्यामुळे आंबा खाणाऱ्या ग्राहकांना अतिशय कमी दराने यंदा आंबा उपलब्ध झालेला आहे.

माळशिरस तालुक्यात सरासरी ४२७ मिलिमीटर पाऊस पडत असतो. तालुक्यात एकूण ११४ गावे असून एकूण भौगोलिक क्षेत्र एक लाख साठ हजार आठशे दोन हेक्टर आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र ९१ हजार ९९५ हेक्टर आहे.

माळशिरस तालुक्यातील शेतीक्षेत्र (हेक्टरमध्ये)

खरीप क्षेत्र सरासरी ११ हजार २१२

ऊस क्षेत्र २७ हजार ७९८

रब्बी क्षेत्र सरासरी ३१ हजार ९६६

फळबाग क्षेत्र २१ हजार १९

एकूण लागवडीखालील क्षेत्र ९१ हजार ९९५ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT