Madgyal Sheep  Agrowon
ॲग्रो विशेष

Sheep Rearing : पूर्व खानदेशात मेंढपाळ बांधव लवकर दाखल

Shepherds : खानदेशात यंदा पाऊस मुबलक आहे. माळरानात मुबलक चारा आहे. अशातच पश्चिम भागातील मेंढपाळ बांधव खानदेशात याच महिन्यात दाखल झाले आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पाऊस मुबलक आहे. माळरानात मुबलक चारा आहे. अशातच पश्चिम भागातील मेंढपाळ बांधव खानदेशात याच महिन्यात दाखल झाले आहेत. चारा व पाणीटंचाई यंदा दिसत नाही. दरवर्षी मेंढपाळ बांधव मार्चमध्ये दाखल व्हायचे. पण यंदा ही मंडळी लवकर दाखल झाली आहेत.

खानदेशात धुळे, नंदुरबार भागातील मेंढपाळ बांधव येतात. यंदा नाशिकमधील नांदगाव व लगतच्या भागातील मेंढपाळही आले आहेत. पऱ्हाटीचे क्षेत्र यंदा लवकर उलंगवाडीत जाईल, अशी स्थिती आहे. कारण पाऊस अधिक झाला. खरिपातील पिके घेऊन क्षेत्र रिकामे झाले आहे. कोरडवाहू क्षेत्रात खरिपातील पिके लवकर संपली.

यामुळे या भागात मेंढ्यांची चराई सुरू दिसत आहे. दरवर्षी ही मंडळी मार्च ते एप्रिल या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, रावेर, यावल, चोपडा, जळगाव, भडगाव, धुळ्यातील शिरपूर आदी भागात दाखल होते. परंतु यंदा अनेक दिवस लवकर ही मंडळी आली आहेत. शेतकरी आपल्या रिकाम्या क्षेत्रात या मंडळीला मेंढ्या व संसाराची जागा देतात. दोन-पाच दिवस एका शेतकऱ्याकडे ही मंडळी मुक्कामी असतात.

त्याचा दरदिवसाचा पाच-सात हजार रुपये मोबदला या मंडळींना मिळतो. तसेच स्थानिक ग्रामपंचायतीदेखील आपल्या पूर्ण शिवारात या मेंढपाळांना चराई व पाण्यासंबंधीची मोकळीक निधी घेऊन देतात. जेवढे शिवार मोठे तेवढा मोबदला अधिकचा या मंडळींना ग्रामपंचायतींना द्यावा लागतो.

४०० ते ५०० हेक्टर क्षेत्रात चराईसाठी ही मंडळी ग्रामपंचायतींना ५० ते ६० हजार रुपये देतात. दोन ते अडीच महिने ही मंडळी संबंधित क्षेत्रात विविध शेतांत मुक्कामी राहतात. मेंढ्यांचे मलमूत्र शेतांना लाभदायी मानले जाते यामुळे शेतकरी या मंडळींचा मुक्काम आपल्या शेतात ठेवतात.

एका शिवारात चार ते पाच मेंढपाळ आपल्या मेंढ्या, संसारासह दाखल होतात. पावसाळ्यापर्यंत किंवा अगदी पाच ते १० जूनपर्यंत ही मंडळी शिवारात असतात. चांगला पाऊस झाल्यानंतर त्यांचा मुक्का शेतातून नदीत किंवा शासकीय जागा, गावठाण क्षेत्रात असतो.

आपल्या भागात चांगला पाऊस झाल्यानंतर ही मंडळी आपापल्या गावी पोहोचतात. खानदेशात धुळ्यातील साक्री, धुळे, नंदुरबारमधील नंदुरबार, नाशिकमधील नांदगाव, येवला भागातील मेंढपाळ आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT