Animal Ear Tagging  Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Ear Tagging : मे अखेरपर्यंत करावी जनावरांची इअर टॅगिंग

Animal Branding : जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांचे आवाहन

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Animal Care : पुणे : ‘‘इअर टॅगिंग असल्याशिवाय एक जून नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री करता येणार नसल्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे हे टॅगिंग नसल्यास शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जातील. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी ३१ मे पर्यंत जनावरांचे टॅगिंग करून घ्यावे. त्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा,’’ असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी केले.

केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमध्ये इअर टॅगिंग (१२ अंकी बारकोड) केलेल्या पशुधनाच्या सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्याद्वारे जन्म आणि मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी-विक्रीचा तपशील यासारखी माहिती शासनाकडे राहील. पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांचे इअर टॅगिंग करण्याची मोहीम सुरू आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि ‘कानावर टॅग' असल्याशिवाय १ जूननंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी-विक्री, उपचार केले जाणार नाहीत.

जनावराची इअर टॅगिंग शिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतुकदारावर कारवाई देखील होणार आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई सुद्धा मिळणार नाही, असे डॉ. गर्जे यांनी सांगितले.

जिल्ह्यात २०१९ च्या पशुगणनेनुसार ११ लाख ४४ हजार ८९३ जनावरे आहेत. आतापर्यंत जवळपास ७० टक्के जनावरांचे इअर टॅगिंग करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी, व्यापाऱ्यांनी जनावरांचे इअर टॅगिंग करून घ्यावे.
- संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT