E-Sakal Agrowon
ॲग्रो विशेष

E-Sakal : ई सकाळच नंबर एक; मराठी डिजिटल माध्यमात वाचकांनी दिली पसंती

Sakal Media Group : ई सकाळने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षातच आणखी एक यशाचे शिखर गाठले आहे. कॉमस्कोरच्या ताज्या आकडेवारीनुसार ई सकाळने मराठी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये भारतात नंबर १ चे स्थान पटकावले आहे.

Team Agrowon

Sakal Epaper : पुणेः ई सकाळने आपल्या रौप्यमहोत्सवी वर्षातच आणखी एक यशाचे शिखर गाठले आहे. कॉमस्कोरच्या ताज्या आकडेवारीनुसार ई सकाळने मराठी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये भारतात नंबर १ चे स्थान पटकावले आहे. यावरून ई सकाळचा मराठी वाचकांवरील प्रभाव आणि वाचकांनी ई सकाळला दिलेली पसंती सिध्द होते.

सकाळ माध्यम समुहाच्या डिजिटल माध्यम असलेले ई सकाळ तंत्रज्ञान आणि अद्यावत बदलांना जुळवून घेत वाचकांनाही बदलत्या काळात सक्षम पर्याय उपलब्ध करून देत आहे. ई सकाळने घडलेल्या घडामोडी वाचकांपर्यंत वेळेत पोचवण्याचे काम केले. तसेच राजकारण, समाजकारण, शेती, क्रीडा, तंत्रज्ञान क्षेत्रातील माहीती आणि घडामोडी वाचकांपर्यंत पोचवल्या आहेत. 

सकाळ माध्यम समुहाने डिजिटल युगात पाऊल टाकत २६ जानेवारी २००० रोजी 'ई-सकाळ'ची सुरुवात केली होती. 'ई-सकाळ'ला डिजिटल युगात पाऊल ठेऊन आता २५ वर्षे झाली. आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात 'ई-सकाळ'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. वाचकांना केंद्रस्थानी ठेवून आपला देदीप्यमान वारसा यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहे. त्याला वाचकांचीही साथ मिळत आहे. 

मराठी माध्यमांमध्ये विश्वासार्ह आणि वेळेत माहीत वाचकांपर्यंत पोचविण्याची परंपरा 'ई-सकाळ'ने कायम ठेवली. प्रत्येक बातमी, अपडेट वाचकांना विश्लेषणासह 'ई-सकाळ' देत आहे. त्यामुळे वाचकांनी 'ई-सकाळ'ला जगात नंबर केले आहे.

‘कॉमस्कोअर’च्या अहवालानुसार, ई-सकाळला १३.५ मिलियन युनिक युजर्सचा प्रतिसाद मिळाला. लोकमत (११ मिलियन), लोकसत्ता (६.८ मिलियन), टीव्ही९ मराठी (७.४ मिलियन) आणि एबीपी माझा (७.२ मिलियन) यांना ई-सकाळने (१३.५ मिलियन) मागे टाकले आहे.

सकाळ माध्यम समुह 'ई-सकाळ' सरकारनामा, गोमन्तक, साम टीव्ही, अॅग्रोवन या वेबपोर्टल्सच्या माध्यमातून मराठी डिजिटल माध्यम विश्वात आपला दबदबाव राखून आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune MTI Journey: ‘एमटीआय’ची आठ दशकी दमदार वाटचाल

Orange Farming: करंजी परिसरातील शेतकऱ्यांना संत्र्यातून दिलासा

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

SCROLL FOR NEXT