E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E-Peek Pahani : डीसीएस मोबाईल ॲपद्वारे होणार ई-पीक पाहणी

Rabi Season 2024 : रब्बी हंगाम एक डिसेंबर पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. प

Team Agrowon

Beed News : रब्बी हंगाम एक डिसेंबर पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरूस्ती करून नवीन रूपात ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

या नंतर १०० टक्के पीक पाहणी सुधारित ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी. जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शेतकरी स्वत: पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरीत पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही, ते तलाठी यांच्यामार्फत होत असते. त्यामध्ये दुरूस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहायक यांची नेमणूक करण्यात येत आहे.

प्रत्येक गावासाठी सहायक उपलब्ध राहणार असून सहायकामार्फत पीक नोंदणी होणार आहे. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सहायक उपलब्ध असेल, असेही प्रशासनाने कळवले आहे.

नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता

  • पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे.

  • पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT