E Peek Pahani  Agrowon
ॲग्रो विशेष

E Peek Pahani : जळगाव जिल्ह्यात ई-पीकपाहणी सुरू करा

Crop Registration : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी उपक्रम सुरू आहे. पण अद्याप पीकपेरा लागवड ई-पीकपाहणीद्वारे होत नसल्याची स्थिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीकपाहणी उपक्रम सुरू आहे. पण अद्याप पीकपेरा लागवड ई-पीकपाहणीद्वारे होत नसल्याची स्थिती आहे. खरिपात या पीकपाहणीस कमी प्रतिसाद मिळाला. रब्बीत मात्र प्रतिसाद चांगला राहील, असे दिसत आहे.

सध्या केळी, मका, कलिंगड, कांदा, ज्वारी, हरभरा, गहू पेरणी व लागवड सुरू आहे. पूर्वहंगामी पीक लागवड पूर्ण झाली आहे. परंतु या लागवडीच्या नोंदी ऑनलाइन किंवा सातबारावर दिसत नसल्याची स्थिती आहे. कारण अद्यापही शासनाने ई-पीकपाहणी सुरू केलेली नाही.

अॅण्ड्रॉइड मोबाइलच्या मदतीने ई-पीकपाहणी अॅपवरून करावी लागते. रब्बी हंगामातील पीक पेऱ्यांबाबत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. परंतु ही नोंदणी करता येत नाही. अॅप सध्या बंदच आहे. यामुळे शेतकरी पीककर्ज व अन्य बाबींसाठी पीकपेरा लावलेला सातबारा उतारा देऊ शकत नाहीत.

नेटवर्क, डाटा हवा असतो. स्मार्ट फोन अनेकांकडे नाहीत. यामुळे पेरा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळतो.या स्थितीत पीकपाहणी तलाठ्यांना करून देण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी कायम आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड केले आहे.

त्यांचा खाते क्रमांक व चार अंकी सांकेतांक आहे. हा खाते क्रमांक व सांकेतांकची नोंद केल्यानंतर अॅप सुरू होते. पुढे पीक पाहणीसंबंधी कार्यवाही होते. परंतु अॅप सांकेतांक नोंदणी केल्यावरही कार्यरत होत नाही, अशा तक्रारी आहेत. शेतकरी याबाबत तांत्रिक समस्या घेऊन तलाठी कार्यालयात जात आहेत.

परंतु तलाठी याबाबत दुरुस्ती किंवा इतर कार्यवाहीबाबत असमर्थता दाखवीत आहेत. ई-पीकपाहणी सुरू नाही, असे तलाठी सांगतात. पीकपाहणीची नोंद अॅपवर झाल्यानंतरच सातबारा उताऱ्यावर ही नोंद घेतली जाते. रब्बी हंगाम सुरू झाला आहे. पेरणी सुरू झाली आहे. काहींनी पेरणी पूर्ण केली. परंतु पेरा नोंद अद्यापही उताऱ्यावर होत नाही, असे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT