Onion Export Ban agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Issue : बांगलादेशमधील हिंसाचाराचा कांदा निर्यातीला फटका; पंतप्रधान मोदी यांच्याकडे राजू शेट्टींची मागणी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : बांगलादेशमधील बदलेल्या राजकीय घडामोडींचा राज्यासह देशातील कांदा निर्यातदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्यासह देशभरातून बांगलादेशला होणारी कांद्याची निर्यात थांबली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कांद्याने भरलेले शेकडो ट्रक अडकले आहे. यामुळे नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदार व्यापारी चिंतेत आले आहेत. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. तर केंद्र सरकारने बांगलादेशमधील सध्याच्या काळजी वाहू सरकारशी बोलून तोडगा काढवा, अशी विनंती करावी अशी मागणी केली आहे. 

बांगलादेशमधील अराजकतेमुळे भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत. यामुळे बांगलादेशला पाठवलेला हजारो टन कांदा शेकडो ट्रकांमधून सीमेवर आडकला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यावरून शेट्टी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिलं आहे. 

शेट्टी यांनी, राज्यासह कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा निर्यातदारांची सध्याची स्थिती सांगितली आहे. राज्यातील नाशिक येथून बांगलादेशला कांदा निर्यात केली जात असून शेकडो ५० हून अधिक ट्रक सीमेवर आडकले आहेत. तर इतर राज्यांचेही ट्रक सीमेवरच थांबले आहेत. त्यामुळे बांगलादेशमधील काळजी वाहू सरकारशी केंद्र सरकारने चर्चा करावी. तसेच बांगलादेश सीमेवर अडकलेले ट्रकांच्याबाबत हस्तक्षेप करावा अशी, मागणी शेट्टी यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. सध्याच्या बांग्लादेशमधील स्थितीचा परिणाम थेट भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. तर यामुळे भारतीय बाजारपेठेत देखील कांद्याचे दर भडकण्याची शक्यता शेट्टी यांनी वर्तविली आहे.  

नाशिकचे ५० ते ६० ट्रक 

बांगलादेशमध्ये उसळलेल्या हिंसाचारामुळे येथे तोड-फोड आणि जाळपोळ केली जात आहे. तर तेथील लोक भारतात घुसतील या शक्यतेने भारताच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे नाशिकमधून बांगलादेशला कांदा घेऊन जाणारे ५० ते ६० ट्रक सीमेवर अडकले. यामुळे कोट्यावधीचे व्यवहार ठप्प झाले असून शेतकरी अडचणीत आले आहेत. तर यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

निर्यात शुल्क हटवण्याची विनंती 

दरम्यान भारतीय कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष अजित शहा यांनी देखील बांगलादेशमधील सध्याच्या स्थितीवरून भाष्य केले आहे. तसेच या स्थितीमुळे भारतीय कांद्याला फटका बसू शकतो असेही त्यांनी सांगितले आहे. तर आता केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली बंधणे हटवण्यासह केंद्राने कांद्यावर लादलेले निर्यात शुल्क देखील हटवावे, अशी विनंती शहा यांनी केली आहे. खरिपाची पेरणी चांगली झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्याला वर्षाच्या शेवटी चांगले पीक मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आता निर्यात शुल्क काढून टाकले पाहिजेत. कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी निर्यात पुन्हा सुरू केली पाहिजे, असेही भारतीय कांदा निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष शहा यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi In Wardha : मोदींच्या हस्ते अमरावतीतील टेक्स्टटाईल पार्कचं भूमिपूजन; कापूस उत्पादकांना होणार फायदा?

Cotton Bollworm : गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान

Sericulture : रेशीम शेतीसाठी तुतीच्या सुधारित जाती

Vegetables Market : कोल्हापूर बाजारात टोमॅटो दरात वाढ; कोथिंबीरचे अचानक दर घसरले, कांद्याची आवक वाढली

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

SCROLL FOR NEXT