Sugarcane Cutting Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvester : सातारा जिल्ह्यातील ऊस तोडणी यंत्रांअभावी रोडावली

Sugarcane Season : सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी वाढविलेली संख्या व क्षमता आणि त्याप्रमाणात तोडणी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे यंदाच्या ऊस गळीत हंगामाची गती मंदावली आहे.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी वाढविलेली संख्या व क्षमता आणि त्याप्रमाणात तोडणी यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे यंदाच्या ऊस गळीत हंगामाची गती मंदावली आहे. सध्या टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हंगाम लांबल्यास उसाला पाणी देणे अवघड होणार आहे. त्यातून उसाच्या वजनावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची भीती आहे.

यंदाचा गळीत हंगाम हा नोव्हेंबरमध्ये सुरू झाला आहे. आतापर्यंत तीन महिन्यांत १७ कारखान्यांनी ८२ लाख २४ हजार ८०८ टना ऊस गाळपातून ८५ लाख १२ हजार १७३ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. पण अद्यापही उसाचे क्षेत्र शिल्लक आहे. जिल्ह्यात गत पाच वर्षांत आडसाली ऊस लागवडीकडे कल वाढला आहे.

यामुळे काही कारखान्यांची आडसाली तोडणी अजूनही सुरू आहे. त्यामुळे सुरू, खोडवा, निडवा ऊस तुटण्यास उशीर झाला आहे. त्यातच अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा फसल्याने त्याचा परिणाम सध्या दिसून येत आहे. तसेच उपलब्ध तोडणी यंत्रणेवर ताण येत आहे.

दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने तोडणीच्या कामावरही परिणाम होऊ लागला आहे. यावर्षी कारखान्यांनी हार्वेस्टरचा वापर कमी केला आहे. लहान हार्वेस्टरही उपलब्ध होत असल्याने कारखान्यांनी अशी यंत्रणा वापरून जास्तीत जास्त ऊस तोडणीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे.

त्यामुळे उसाला पाणी देण्यासाठी नदीला सोडलेल्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या वाढलेली टंचाई स्थिती पाहता एखादे आवर्तन होण्याची शक्यता आहे. उर्वरित पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवले जाणार आहे. परिणामी उसाला पुरेसे पाणी न मिळाल्यास वजन घटण्याची शक्यता आहे.

ऊस तोड मजूर घेताहेत गैरफायदा

तोडणीअभावी काही ठिकाणी उसाला तुरे आले आहेत. त्यातच पाणी टंचाई जाणवू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऊस लवकर तुटावा, यासाठी शेतकरी कारखाना कार्यालयावर हेलपाटे घालत आहेत. याचा फायदा ऊस तोड मजुरांकडून घेतला जात आहे. ऊस तोडणीसाठी पैशांची अव्वाच्या सव्वा मागणी केली जात आहे. यासाठी कारखान्यांनी हार्वेस्टर वाढवून ऊस लवकर तोडावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT