jal Jeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

jal Jivan Mission : निधीअभावी जलजीवनच्या कामांना ब्रेक लागणार

Water Supply Scheme : जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात पूर्ण झालेल्या ९२ कामांची २९ कोटी ५२ लाखांची देयके २० जुलैपासून प्रलंबित आहेत. ती तत्काळ देण्याची ठेकेदारांची मागणी आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषदेकडून जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात पाणीपुरवठ्याची कामे सुरू आहेत. मात्र, त्या कामाची देयके थकल्याने कामे बंद ठेवण्याचा इशारा ठेकेदारांनी दिला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशन अभियानाच्या संचालकांकडे अनेकदा निधीची लेखी मागणी केली आहे.

त्यासाठी पाठपुरावाही केला आहे. राज्य सरकारने वेळेत निधी उपलब्ध करून न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेला ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.

जलजीवन मिशनमधून जिल्ह्यात पूर्ण झालेल्या ९२ कामांची २९ कोटी ५२ लाखांची देयके २० जुलैपासून प्रलंबित आहेत. ती तत्काळ देण्याची ठेकेदारांची मागणी आहे. मात्र, मागणी करूनही सरकारकडून निधी मिळत नसल्याने आणि ठेकेदारांच्या वाढत्या तगाद्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हतबल झाला आहे.

प्रलंबित देयके न मिळाल्यास २० सप्टेंबरपासून कामबंद ठेवणार असल्याचे ठेकेदारांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद प्रशासनाला कळविले आहे. करारानुसार कामे बंद ठेवता येत नसली तरी कामावर खर्च केलेली रक्कमच मिळत नसल्याने ठेकेदारांवर टोकाची भूमिका घेण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाकडून तीनवेळा निधीची मागणी

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सहा ऑगस्ट, १४ ऑगस्ट व १६ ऑगस्टला राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशन अभियानाच्या संचालकांकडे निधीची मागणी करण्यात आली आहे.

थकीत बिले ठेकेदारांना मिळावीत, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करायला हवा. चौकशीच्या नावाखाली ६० ते ६५ कामे बंद आहेत. ती बिले देण्याबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी. बिले मिळत नसल्याने ठेकेदार वैतागले आहेत. २० सप्टेंबरनंतर कामबंद ठेवण्यावर आम्ही ठाम आहोत.
- मोतीलाल राठोड, अध्यक्ष, ग्रामीण पाणीपुरवठा ठेकेदार संघटना
जलजीवनमधून पूर्ण झालेल्या कामांची बिले देण्यासाठी ६१ कोटी रुपये मिळावेत, याची राज्याच्या पाणी व स्वच्छता मिशन अभियान संचालकांकडे मागणी केली आहे. निधी मिळाल्यानंतर ठेकेदारांची प्रलंबित बिले देण्यात येतील.
- संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT