Math Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Update : वाढत्या उन्हामुळे माठाला वाढती मागणी

Cold Water Tank : गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.

Team Agrowon

Ranjangaon Sandas News : गेल्या काही दिवसापासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, वाढत्या तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी गरिबांचा फ्रिज समजल्या जाणाऱ्या माठांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. फिरत्या विक्रेत्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला थाटलेल्या दुकानांमध्ये माठ खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात उन्हाचा पारा ३९ अंश सेल्सिअसवर गेला असल्याने उन्हाचे चटके जाणवायला सुरुवात झाली आहे. फ्रिजचे थंड पाणी पिणे आरोग्यास बाधक असल्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिक माठातील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतात.

मागणी वाढल्याने ग्रामीण भागात माठांच्या किमतीतही वाढ झाली आहे. तोटी व कलाकुसर असलेले माठांच्या किमती २० ते ३५ टक्क्यांनी वाढल्याने सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका बसत आहे.

परिणामी, नैसर्गिक थंड पाण्यासाठी नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. मातीच्या मडक्यातील पाणी शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने अनेक जण फ्रिजऐवजी माठातील नैसर्गिक थंड पाणी पिणेच पंसत करतात.

माठात पाणी ठेवल्यास त्यात नैसर्गिकरीत्या मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिजे असतात. त्यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. उष्माघात होण्यापासून बचाव होतो. माठ नैसर्गिकरीत्या थंड पाणी ठेवतो. उन्हाळ्यात सर्वांनी माठातील पाणी प्यायल्यास आरोग्यास हितकारक राहील.
डॉ. श्वेता लोखंडे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

Paddy Nursery Update: भाताच्या ५८६१ हेक्टरवर रोपवाटिका

Free Seed Distribution: दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT