Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Rain Issue: अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये कांदा रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा रोपांची अवस्था बिकट झाल्याने लागवडीसाठी रोपे उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होणार आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News: अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात पिकांना मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये कांदा रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा रोपांची अवस्था बिकट झाल्याने लागवडीसाठी रोपे उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होणार आहे.

गेल्या महिन्यापासून कांद्याच्या दरात सुधारणा व सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल दिसून आला. शेतकऱ्यांनी महागडे कांदा बियाणे घेऊन कांदा रोपवाटिकांची उभारणी केली; मात्र ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे कांदा रोपांची अतोनात हानी झाली आहे. सपाट वाफ्यांमध्ये रोपांचे सर्वाधिक नुकसान असून, काही प्रमाणात गादी वाफ्यांमधील रोपांचे नुकसान आहे.

सलग तीन ते चार दिवस झालेल्या पावसाने प्रामुख्याने मालेगाव, सटाणा, कळवण, देवळा, येवला, चांदवड, नांदगाव व सिन्नर तालुक्यांतील कांदा उत्पादक पट्ट्यात रोपवाटिका मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे दिसून येत आहे. मातीतील बुरशीजन्य रोगांचा विळखा वाढला असून, वाचलेली थोडीफार रोपेही नुकसानीच्या विळख्यात सापडली आहे.

एकीकडे कांदा रोपवाटिका उभारणी करण्यापूर्वीच कांदा बियाण्यांची टंचाई होती. त्यातच आता पुन्हा नुकसान झाल्याने बियाणे आणायचे कुठून, हा मोठा प्रश्‍न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे पुन्हा बियाण्यांची शोधाशोध करून व दुबार खर्च करून कांदा रोपवाटिका शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.

दिसून येत असलेले नुकसान :

- उपळलेल्या शेतात पाणी असल्याने रोपवाटिका बाधित.

- पाने पिवळी पडून रोपे खराब.

- रोपांच्या खालील भागात मूळकुज.

- नवीन रोपवाटिकेमध्ये लहान रोपे मातीखाली.

रोपे शिल्लक राहणार नाही, अशी बिकट स्थिती आहे. पाणी साचल्याने रोपे पिवळी पडून मूळकुज होऊन सडली. त्यात आता दव व धुके पडत असल्याने रोपांचे पूर्णतः नुकसान आहे. पाऊस झाल्यानंतर दोन दिवस कांदा रोपवाटिकेतील पाणी बाहेर काढावे लागले. बुरशीजन्य रोगांमुळे नुकसान वाढत असून, कांदा लागवड अडचणीत आहे.
मधुकर मोरे, शेतकरी, मोरेनगर, ता. सटाणा
२५ हजार रुपयांचे कांदा बियाणे टाकलेले होते. मात्र जोरदार पावसामुळे कांदा बियाणे दाबून गेले असल्याने मोठे नुकसान आहे.
भूषण कचवे, शेतकरी, दहिदी, ता. मालेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची  खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही

Single Women Survey: मराठवाड्यात ग्रामपंचायतस्तरावर ४.९३ लाख एकल महिलांची नोंद

Delhi Excise Policy Case : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी केजरीवाल, सिसोदिया निर्दोष, अश्रू अनावर

Warehouse Receipt: बुर्किना फासो गोदाम पावतीवर व्यवहार

Water Conservation: वृक्षारोपण, जलसंवर्धनाचा प्रोत्साहक योद्धा

SCROLL FOR NEXT