Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : ‘दुष्काळसदृश’मधून कोरडवाहू कोरडगावच वगळले

Drought Update : शेतकऱ्यांना पाण्याअभावी पेरणी करता आली नाही, यापुढचे जुलैपर्यंतचे आठ महिने कसे काढायचे, अशी चिंता असूनही शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश मंडळलांतून कोरडगाव (ता. पाथर्डी) मंडळाला वगळले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : कोणत्याही धरणाचे शाश्वत पाणी नाही, बहुतांश भाग कोरडवाहू, यंदा तर पाऊसही कमी, त्यामुळे खरिपातील बहुतांश पिके वाया गेलेली, रब्बीत अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी पेरणी करता आली नाही, यापुढचे जुलैपर्यंतचे आठ महिने कसे काढायचे, अशी चिंता असूनही शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळसदृश मंडळलांतून कोरडगाव (ता. पाथर्डी) मंडळाला वगळले आहे.

या भागावर शासनाकडून अन्याय होत असल्याची भावना या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात वगळलेले कोरडगाव हे एकमेव मंडल असून त्यातील गावांना सरकाच्या मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे. यंदा अनेक भागात पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे खरिपात पिकांचे नुकसान झाले, तर पाण्याअभावी रब्बीतही अनेक गावांत पेरण्या झाल्या नाहीत.

जे पेरले तेही येईल की नाही याची शाश्वती नाही. शासनाने दुसऱ्या टप्प्यात दुष्काळसदृश मंडले जाहीर करताना जिल्ह्यातील ९६ मंडलांचा समावेश केला. मात्र त्यातून कोरडगाव हे एक मंडल वगळले. दुष्काळ असूनही का वगळले, असा प्रश्‍न येथील शेतकरी विचारत आहेत.

कोरडगाव मंडलात पाऊस कमीच

दुष्काळसदृश जाहीर झालेल्या मंडलांत सरासरीच्या ७५ टक्केपेक्षा कमी किंवा ७५० मिलिमीटरच्या आत पाऊस झालेला असावा, असा नियम आहे. कोरडगाव मंडलात यंदा ५६१ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

कापूस हे प्रमुख पीक असून त्याच्या उत्पादनात ४० ते ५० टक्के घट झाली आहे. रब्बीत ज्वारी व अन्य पिकांची काही भागात पाण्याअभावी पेरणी झालेली नाही. अशी दुष्काळी परिस्थिती असतानाही कोरडगावला वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming Success Story: संतुलित आहार आणि नियोजनबद्ध गोठा व्यवस्थापनावर भर

Orchard Management: तापमानवाढ, कमी आर्द्रता स्थितीत बागेचे व्यवस्थापन

Farmer Success Story: प्रयोगशील शेतकरी उद्योजक

Water Conservation: जलसंधारणातील साथीदार...

Ethanol Blended Petrol: केंद्राचे मोठे पाऊल; पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉल मिश्रण, मसुदा जारी

SCROLL FOR NEXT