Maharashtra Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : अमरावती जिल्ह्यात दुष्काळावर शिक्‍कामोर्तब

Saurabh Katiyaar : ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने खंड दिल्याने उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि पिकांची वाढ खुंटली. सरासरी उत्पादनात घट येणार असल्याने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४१ महसूल मंडलांत पीक विम्यासाठी अधिसूचना काढली.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगामाच्या सुरुवातीला व त्यानंतर ऑगस्ट महिन्यातील पावसाचा प्रदीर्घ खंड, एकूण हंगामात सरासरीपेक्षा ३१ टक्‍के कमी झालेला पाऊस यामुळे उत्पादकता प्रभावित झाली. त्याआधारेच प्रशासनाने जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ जाहीर केली आहे. या माध्यातून दुष्काळावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

गेल्या खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात पावसाने खंड दिल्याने पेरण्यांना विलंब झाला. त्यानंतर पावसाने काही भागात हजेरी लावली. परंतु पेरणीला विलंब झाल्याने त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल, अशी शक्‍यता आधीच कृषी तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने खंड दिल्याने उत्पादकतेवर त्याचा परिणाम झाला. कीडरोगांचा प्रादुर्भाव देखील या काळात वाढला.

पिकांची वाढ खुंटली. सरासरी उत्पादनात घट येणार असल्याने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी ४१ महसूल मंडलांत पीक विम्यासाठी अधिसूचना काढली. खरिपात मूग, उडदाच्या सोंगणीची वेळच आली नाही. कपाशीची वाढ खुंटली त्यातच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर रोटाव्हेटर फिरविला.

तालुकानिहाय बाधित गावे

अंतिम पैसेवारीनुसार अमरावती तालुक्यात १४३, भातकुली १४२, तिवसा ११५, नांदगाव १६१, मोर्शी १५९, वरुड १४२, अचलपूर १८६, चांदूरबाजार १७१, दर्यापूर १५६, अंजनगावसूर्जी १२८, धारणी १५२, चिखलदरा तालुक्‍यांत १४५ गावे बाधित झाली आहेत.

तालुकानिहाय पैसेवारी

अमरावती ४७

तिवसा ४८

चांदूररेल्वे ४८

धामणगाव रेल्वे ४७

नांदगाव खंडेश्‍वर ४८

मोर्शी ४६

वरुड ४७

अचलपूर ४७

चांदूरबाजार ४७

दर्यापूर ४७

अंजनगावसूर्जी ४५

धारणी ४९

चिखलदरा ४८

भातकुली ४८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा, ३४४ कोटी निधी मंजूर

Rainfall Sowing Advisory: मॉन्सूनपूर्व पावसावर पेरणीची घाई करू नये : दत्तकुमार कळसाईत

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ महामार्गात बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार : जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस

Fertilizer Shortage: युरिया, डीएपी, पोटॅश, एनपीके ग्रेडच्या खतांचा कमी पुरवठा

Monsoon Preparedness Concerns: मॉन्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT