Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : नंदुरबार जिल्ह्यातील १४ महसुली मंडलांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर

Drought Crisis : राज्यातील एक हजार २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने घोषित केली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील १४ महसुली मंडळांचा समावेश आहे.

Team Agrowon

Nandurbar News : राज्यातील एक हजार २१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती शासनाने घोषित केली आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील १४ महसुली मंडळांचा समावेश आहे. चाळीस तालुक्यांत दुष्काळ घोषित केल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या महसुली मंडळांचीदेखील शासनाने घोषणा केली आहे.

त्यामुळे या महसूल मंडळांमध्ये दुष्काळाच्या सवलती लागू होणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात यापूर्वी संपूर्ण नंदुरबार तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. त्यात तळोदा, नवापूर व शहादा तालुक्यातील १४ महसुली मंडळांची भर पडली.

राज्यातील ४० तालुक्यांत कमी पर्जन्यमानामुळे ३१ ऑक्टोबर २०२३ ला शासनाने दुष्काळ जाहीर केला होता. त्यामुळे ४० तालुक्यांत विविध सवलतींची घोषणा करण्यात आली होती. मात्र इतर तालुक्यांतील एक हजार २१ महसुली मंडळांमध्ये कमी पर्जन्यमान आढळून आले होते. त्यामुळे त्या महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

यात नंदुरबार जिल्ह्यातील १४ महसुली मंडळांचा समावेश आहे. शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, मंदाणे, असलोद, शहादा, मोहिदे, कलसाडी, प्रकाशा, ब्राह्मणपुरी, म्हसावद तसेच तळोदा तालुक्यातील बोरद व सोमावल, नवापूर तालुक्यातील खांडबारा व विसरवाडी मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे या मंडळांमधील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीच्या सवलती लागू होणार आहेत.

दुसरीकडे यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यात पावसाने जेमतेम हजेरी लावली होती. त्यात पावसाची आकडेवारी मंडळनिहाय कमी-जास्त होती. त्यात तळोदा मंडळात ७९१ मिलिमीटर, बोरद मंडळात ५२१ मिलिमीटर, प्रतापपूर मंडळात ७२३ मिलिमीटर व सोमावल मंडळात ८४४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यात भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जाऊ लागली आहे.

अशा असतील सवलती

जमीन महसुलात सूट. सहकारी कर्जाचे पुनर्गठन

शेतीशी निगडित कर्जाची वसुली स्थगिती

कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट

शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

रोहयोंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता

आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर

टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीजजोडणी खंडित न करणे या सवलती लागू होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT