Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Drought : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यात पाहणी

Drought Update : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ, आणि लोणी भापकर या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.

Team Agrowon

Baramati News : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी, चांदगुडेवाडी, उंडवडी सुपे, देऊळगाव रसाळ, आणि लोणी भापकर या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी केली.

पथकामध्ये केंद्रीय अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकारी सरोजिनी रावत, केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, महावितरण बारामती ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ आदी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाकडून जळालेली पिके, कोरड्या पडलेल्या विहिरी, शेतकऱ्यांसाठी सद्यःस्थितीत असलेल्या पाण्याची व्यवस्था, पाण्याच्या पातळीची खोली, विहिरी, बोअरवेलचे प्रमाण, पिण्याचे पाणी, त्याची साठवणूक, जलयुक्त शिवाराची कामे, जनावरांसाठी लागणारा चारा, पिकांचे नुकसान आदींबाबत शेतकरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींशी चर्चा केली.

या केंद्रीय समितीकडून बारामतीच्या जिरायती भागातील पाण्याचे उपलब्ध सार्वजनिक स्रोत त्यावरती झालेली कामे, याशिवाय पाण्याची सध्याची परिस्थिती, टंचाईची परिस्थिती याची माहिती स्थानिक शेतकरी यांच्याकडून घेण्यात आली.

या वेळी उपस्थितीत लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी दुष्काळ सदृश परिस्थितीची माहिती दिली. सरकारने टंचाईग्रस्त गावात चारा छावण्या सुरू कराव्यात, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या पाहणी दौऱ्याच्या आधारे दुष्काळाबाबत केंद्र शासनास अहवाल सादर करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT