Ahmednagar  Agrowon
ॲग्रो विशेष

Bail Pola 2023 : दुष्काळाचे पोळा सणावर सावट

Bail Pola Festival : अहमदनगर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून, त्याचा परिणाम पोळा सणावर दिसून येत आहे. त्याचबरोबर राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव पसरत असल्याने अनेक ठिकाणी पोळ्यावर निर्बंध आहेत. लम्पीचा फैलाव रोखावा यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

Team Agrowon

Ahmednagar News : पावसाळ्याचे तीन महिने उलटले तरी अजूनही पुरेसा पाऊस नाही. अनेक भागांत खंड पडल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असून, त्याचा परिणाम पोळा सणावर दिसून येत आहे. त्याचबरोबर राज्यात लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव पसरत असल्याने अनेक ठिकाणी पोळ्यावर निर्बंध आहेत. लम्पीचा फैलाव रोखावा यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा बैलपोळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या साहित्य खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. पोळ्यानंतर परतीचा पाऊस येतो. मात्र परतीच्या पावसाचीही शाश्‍वती दिसत नसल्याने शेतकरी हवालदिल आहेत. नगर जिल्ह्यात अजूनही अनेक भागांत पुरेसा पाऊस नाही. बैलपोळ्याला शेतकरी सजावटीचे साहित्य खरेदी करतात. शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टरसारखी साधने जरी असली तरीही गाई, म्हशी, शेळ्या आजही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आहेत.

या प्राण्यांना का होईना शेतकरी गोंडे, शेंदूर, चवार, हिंगुळ असे साहित्य आपल्या जनावरांना घेऊन जातात. बैलाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे मुथळे, घुंगरमाळ, पितळी तोडा, मोरखी, झालर, शेंब्या आदी वस्तूंना मागणी आता कमी झाली आहे व त्यानुसार विक्रेतेही कमी झाल्याचे व्यापारी सांगतात.

दुष्काळ असो की नसो मुक्या प्राण्यांना त्याचं काहीही नसते पण आपल्या घरी असलेल्या बैल, गाई, म्हशी यांचा सण त्यांना सजवून त्यांना गोड गोड खाऊ घालूनच साजरा करत असतो तरच मनाला प्रसन्न वाटते, असे प्रगतिशील शेतकरी आसाराम अकोलकर यांनी सांगितले.

बैल कमी झाले असले तरीही शेतकऱ्यांच्या दारात शेळी, गाई, म्हशी आहेत त्यासाठी का होईना शेतकरी साहित्य घेऊन जातात दुष्काळसदृश परिस्थिती होताना दिसत आहे. त्याचा परिणाम विक्रीवर होत आहे.
विश्‍वनाथ जंगम, साहित्य विक्रेते करंजी, ता. पाथर्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT