Bail Pola Festival : बैलपोळ्यासाठी बाजारपेठा फुलल्या, दुष्काळामुळे बळीराजा संकटात

sandeep Shirguppe

बैल पोळा सण

दरवर्षी श्रावण अमावस्या दिवशी बैल पोळा (Bail Pola) साजरा केला जातो. यंदाचा १४ सप्टेंबरला बैलपोळा पार पडत आहे.

Bail Pola Festival | agrowon

बाजारपेठा फुलल्या

दरम्यान बैलपोळ्यानिमीत्त बाजारपेठेत देखील विविध प्रकारचे बैलाना सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

Bail Pola Festival | agrowon

बैलांप्रति शेतकऱ्याची कृतज्ञता

शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात राबवणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैलपोळा आनंदात साजरा करत असतो.

Bail Pola Festival | agrowon

बाजारपेठेत भरपूर साहित्य

बैलपोळा सणासाठी रंगीबेरंगी माळा, झालर, विविध प्रकारचे कंडे, गोंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी विविध प्रकारचे कलर असे साहित्य मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालं आहे.

Bail Pola Festival | agrowon

बैलांची सजावट

बैलपोळा दिवशी बैलांना रंगीबेरंगी कलरने सजवून त्याच्यावर आकर्षक नक्षीकामे केले जाते. यानंतर सजवलेल्या बैलांची वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. फटाके वाजवले जातात.

Bail Pola Festival | agrowon

पावसाने निराशा

यासाठी शेतकरी बऱ्याच दिवसांपासून तयारी करत असतो. पण यंदा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे.

Bail Pola Festival | agrowon

तरीही बळीराजा उदार

परंतु शेतकरी बैलांचा सण साजरा करण्यासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तसंच विविध साहित्याने देखील बाजारपेठ फुलली आहे.

Bail Pola Festival | agrowon

बैलजोडीचे वर्षभर योगदान

बैलपोळा सणाला शेतकरी खूप महत्व देतात. शेतात चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकरी व मजुरांबरोबरच बैलजोडीचेही योगदान खूप असते.

Bail Pola Festival | agrowon

गावभर मिरवणूक

पोळ्यानिमित्त शेतकरी बैलजोडीला सजवून गावभर गावदेवांना वाजत गाजत पाया पडण्यासाठी नेतात. तसंच प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी या दिवशी घरी गोड पदार्थ बनवले जातात.

Bail Pola Festival | agrowon
gautami patil | agrowon
आणखी पाहा...