Fee Waiver  Agrowon
ॲग्रो विशेष

School Fee Waiver : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना शुल्कमाफीची प्रतीक्षाच

Drought-affected students Fees Update : दुष्काळ जाहीर होऊन चार महिने झाले, पण जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क परत मिळालेले नाही.

Team Agrowon

Solapur News : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील जवळपास पाच हजार २०० विद्यार्थ्यांची यादी उच्चशिक्षण विभागाला व जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविली आहे. पण दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची यादी अजून अंतिम झाली नाही. दुष्काळ जाहीर होऊन चार महिने झाले, पण जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला परीक्षा शुल्क परत मिळालेले नाही.

जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांसह दहावी-बारावी व उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सवलती जाहीर झाल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती, कृषिपंपांच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट,

‘रोहयो’अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता, पिण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी टॅंकर, टंचाई जाहीर झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित न करणे आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, अशा सवलती शासनाने जाहीर केल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या बहुतेक सवलती लागू देखील झाल्या आहेत, पण शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क परत मिळालेले नाही. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०८ महाविद्यालये असून, विद्यापीठांतर्गत विविध अभ्यासक्रमांसाठी अंदाजे ६५ हजार विद्यार्थी प्रवेशित आहेत.

त्यातील शहरातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार नाही, पण दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना ही सवलत अपेक्षित आहे. तरीदेखील विद्यापीठाने केवळ पाच हजार २०० विद्यार्थ्यांचीच यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठविली आहे, हे विशेष. निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी त्यासंदर्भातील माहिती दिली.

दुष्काळामुळे दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी मिळणार आहे. त्यासाठी १२ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांची यादी बोर्डाला द्यायची आहे. सर्व शाळांमधील मुख्याध्यापकांना मुदतीत यादी देण्यासंदर्भातील सूचना केल्या आहेत.
सचिन जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manoj Jarange Patil: आंदोलन मोडीत काढण्याचा सरकारचा डाव : मनोज जरांगे

Sangli APMC Trifurcation: सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाचा प्रस्ताव सादर

Gram Panchayat Administrator: कृषी अधिकाऱ्यांचीही ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती होणार

Pomegranate Farming: डाळिंबासाठी स्थानिक सूक्ष्मजीवांचा वापर प्रभावी

MSRTC Women Concession: एसटीमध्ये ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणी पावतीवरही सवलत

SCROLL FOR NEXT