Leopard Attack Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Rescue : बिबट्याच्या रेक्यूचा थरार ; ड्रोनच्या मदतीने अखेर सापडला जाळ्यात

Leopard Terror : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे पंचक्रोशीतील वडाळी नजीक रस्त्यावरील गट क्र. ७५५ मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात सोमवारी (ता. ३) दुपारी तीनपासून बिबट्या दडून बसला होता.

Team Agrowon

Nashik News : निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे पंचक्रोशीतील वडाळी नजीक रस्त्यावरील गट क्र. ७५५ मधील वैभव जाधव यांच्या गव्हाच्या शेतात सोमवारी (ता. ३) दुपारी तीनपासून बिबट्या दडून बसला होता.

मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेनऊपासून दुपारी अडीचपर्यंत बिबट्याला रेस्क्यू करण्याचा थरार जाधव वस्तीवर सुरू होता. ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेतल्यानंतर विशेष म्हणजे वन्यजीव रक्षक शरद जाधव (रा. कसबे सुकेणे) यांनी बिबट्याला जेरबंद केले.

बिबट्या लपून बसल्याने त्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करणे अडचणीचे ठरत होते. या पार्श्‍वभूमीवर कृषी उद्योजक प्रवीण रामराव मोगल यांच्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून या बिबट्याचा शोध घेतल्यानंतर हालचाली समजून घेण्यात आल्या.

त्यानंतर मागोवा घेत निफाड वन विभागाचे वन्यजीव रक्षक शरद जाधव, तसेच कसबे सुकेणे आणि ओझर पोलिसांनी मिळविले. त्यानंतर मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेनऊपासून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबविले.

सुरुवातीला वन विभागाचे पथक व स्थानिक शेतकऱ्यांनी जाळीच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यातून बिबट्या निसटला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात जाधव यांनी बिबट्यावर झेप घेऊन त्यास मानेजवळ पकडले. या दरम्यान वन विभागाने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले व त्यास सुरक्षित ताब्यात घेतले. हा सर्व थरार तब्बल अडीच तास सुरू होता.

निफाड येथील वनपाल भगवान जाधव, विजय दोंदे, विजय माळी, शरद चांदोरे, वैभव जाधव, राहुल गुंजाळ व पोलिस व स्थानिक शेतकऱ्यांचा या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभाग होता. वन विभागाने पंचनामा करून त्यास विशेष वाहनाने निफाड येथे नेत त्याची पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केली. हा मादी बिबट्या असल्याचे समजते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT