Drone Pilot Training agrowon
ॲग्रो विशेष

Drone Pilot Training : कोकण कृषी विद्यापिठात ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र; १० पास विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Konkan Agricultural University : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिली आहे.

sandeep Shirguppe

Drone Pilot Training Center Dapoli : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास नवी दिल्लीतील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मान्यता दिली आहे. कृषी विद्यापीठात स्थापन करण्यात येणारे ड्रोन प्रशिक्षण केंद्र हे महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम वर्गांतील ड्रोन चालविणारे पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्यावतीने संचालक आणि सहायक संचालक यांनी विद्यापीठाला भेट दिली होती. यावेळी ड्रोन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधांची तपासणी केली. यानंतर त्यांनी त्याचा अहवाल महासंचालनालयाला सादर केला होता. त्या अनुंषगाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आणि संचालक डॉ. पराग हळदणकर आणि डॉ. सतीश नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत.

याबाबत लवकरच प्रशिक्षणाला सुरुवात होणार असल्याचे वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रभारी आणि प्रकल्प प्रमुख डॉ. संतोष सावर्डेकर यांनी सांगितले आहे. पीबीसी एरोहा, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला असून, प्रशिक्षण केंद्र संयुक्त विद्यमाने चालविण्यात येणार आहे.

या प्रशिक्षण केंद्रामार्फत कोकणातील आणि अन्य भागांतील तरुणांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन उडविण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातर्फे परवाना देण्यात येणार आहे. त्यातून रोजगार निर्मितीचे नवीन दालन उपलब्ध होणार आहे. कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि इतर पिकांवर कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच विद्राव्य खतांच्या फवारणीसाठी ड्रोनचा उपयोग केला जाणार आहे.

ड्रोनव्दारे फवारणी केल्याने कीटकनाशकांची आणि खतांची परिणामकारकता वाढणार असून, शेतकऱ्यांची, फवारणीसाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती तसेच किमान शैक्षणिक अर्हता दहावी उत्तीर्ण असल्यास त्यांना १ आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रशिक्षण सशुल्क असून, त्याची नोंदणी विद्यापीठस्तरावर तसेच सारथी, बारटी या संस्थेकडे केल्यास त्यांच्याकडून प्रशिक्षण शुल्क आणि आर्थिक सहाय्य प्राप्त होईल, अशी माहिती डॉ. सावर्डेकर यांनी दिली. अधिक माहितीसाठी डॉ. अमित देवगिरीकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT