Divyang Farmer Story  Agrowon
ॲग्रो विशेष

Divyang Farmer : दिव्यांग शेतकऱ्याच्या मुलीचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण

Higher Education : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यांतर्गत डोंगरसोनी गावच्या अल्पभूधारक सतीश बोबडे या शेतकऱ्याच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौघांचा समावेश आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : ‘माझे कुटुंब आणि मी’ अशीच जीवन जगण्याची मर्यादित शैली बहुतांश व्यक्‍तींनी आत्मसात केली आहे. मात्र या संकुचित जीवन शैलीला फाटा देत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत असलेल्या नागपूर कृषी महाविद्यालयाच्या दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास अतकरे यांनी सांगली जिल्ह्यातील दिव्यांग शेतकऱ्यांच्या मुलीचे पालकत्व स्वीकारत तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीवर भर दिला आहे. गेली आठ वर्षे त्यांनी केलेल्या मदतीमुळे त्यांच्या औदार्याचे सर्वदूर कौतुक होत आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्‍यांतर्गत डोंगरसोनी गावच्या अल्पभूधारक सतीश बोबडे या शेतकऱ्याच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी अशा चौघांचा समावेश आहे. अवघ्या एक एकर शेतीत सुरुवातीला हायब्रीड, गहू, हरभरा यांसारखी पिके घेतली जात होती. मात्र या पिकाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कुटुंबाच्या गरजांसाठी लागणारा पैसा उभारणेच अवघड होत होते.

परिणामी, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करण्याचे आव्हान या कुटुंबीयांसमोर सातत्याने उभे राहत होते. घरातील मोठ्या मुलीची उच्च शिक्षणाची इच्छा होती. परंतु पैशाअभावी शिक्षण कसे द्यावे, असा प्रश्‍न पडत होता. या बाबत नागपूर कृषी महाविद्यालयांतर्गत दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अतकरे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली.

त्यांनी ही अस्वस्थता लक्षात घेत या कुटुंबीयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. दर महिन्याला अडीच हजार रुपये याप्रमाणे १२ महिन्यांचे धनादेश या कुटुंबाला पाठविण्यावर त्यांनी २०१६ पासून सातत्य राखले.

याच अल्प मदतीतून वसतिगृहासाठीच्या पैशाची सोय होत गेली आणि मुलीने फार्मसी कराड येथून पूर्ण केले. तसेच एमफार्म मुंबई येथून पूर्ण केले. या शिक्षणाच्या बळावर या स्वरांजली नामक मुलीला बायकॉन बायोलॉजीक्‍स या कंपनीच्या क्‍युसी इन्सुलीन डिपार्टमेंटमध्ये बंगळुरू येथे चांगल्या पगारावर नियुक्‍ती मिळाली आहे.

बारावीत स्वरांजलीला ९५ ते ९९ टक्‍के गुण मिळाल्याचे कळाले होते. त्यामुळे हुशार मुलीचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पैशाअभावी पूर्ण झाले नसते, तर आयुष्यभर मनाला वेदना बोचत राहिल्या असत्या. त्यामुळेच या मुलीविषयी कळाल्यानंतर तिला मदतीचा निर्णय घेतला. आज उच्च शिक्षण घेत ती नोकरीवर लागली आहे. पालकांच्या कष्टाचे तीने चीज केले याचे समाधान आहे.
- डॉ. विलास अतकरे, प्रमुख, दुग्धशास्त्र विभाग, नागपूर कृषी महाविद्यालय, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT