Dr. Bhagwan kapse  Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Bhagwan Kapse : ‘महाराष्ट्र कृषी शिक्षण’च्या निवड मंडळावर डॉ. कापसे

Latest Agriculture News : फळ पिकाचे तज्ज्ञ व गट शेतीचे प्रणेते म्हणून ओळख असलेले डॉ. भगवानराव कापसे यांची राज्यातील चारही विद्यापीठांच्या प्राध्यापक ते संचालक पदापर्यंतच्या निवडीसाठीच्या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : फळ पिकाचे तज्ज्ञ व गट शेतीचे प्रणेते म्हणून ओळख असलेले डॉ. भगवानराव कापसे यांची राज्यातील चारही विद्यापीठांच्या प्राध्यापक ते संचालक पदापर्यंतच्या निवडीसाठीच्या समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून डॉ. कापसे तीन वर्षे या निवड समितीत राहतील. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये समन्वय व सुसूत्रता साधण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे.

या परिषदेद्वारे चारही विद्यापीठांतील पदभरती व इतर अनेक विषय समन्वयातून मार्गी लावले जातात. या विद्यापीठांतील प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, अधिष्ठाता संचालक आदी पदांवरील नियुक्तीसाठी एक समिती असते. या समितीमध्ये डॉ. कापसे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम पाहतील.

पुढील तीन वर्षांपर्यंत त्यांना या पदावर काम करता येईल. त्यांच्या नियुक्तीने मराठवाड्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. डॉ. कापसे यांच्यासह ‘आयसीएआर’चे डॉ. रविशंकर सी. एन. यांचीही राज्यपालांनी या मंडळावर नियुक्ती केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

India Economy: देशात सध्या अस्वस्थता : शरद पवार

SCROLL FOR NEXT