Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Resowing Crisis : पाऊस, ढगाळ वातावरणामुळे दुबार पेरणीचे संकट

Rabi Season : नुकताच झालेला वादळी पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक अळ्यांनी फस्त करून टाकले आहे. तर हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Washim News : नुकताच झालेला वादळी पाऊस व सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीचे पीक अळ्यांनी फस्त करून टाकले आहे. तर हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी हरभऱ्याचे पीक वाळत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ऐन फुले व शेंगांच्या मोसमात असलेले तुरीचे पीक भुईसपाट होऊन आळ्यांनी फस्त केले.

तर सततच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन हरभऱ्याचे उभे पीक वाळून जात आहे. आधी कमी पावसामुळे खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.

आता पुन्हा रब्बी हंगामातील पीक वखरून त्या शेतात दुबार पेरणी करावी लागत आहे. तालुक्यातील नेतन्सा, करडा, महागाव, शेलुखडसे आदी गावांतील बऱ्याच शेतकऱ्यांनी मर रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या हरभरा पिकाच्या शेतात वखर फिरवून दुबार पेरणीसाठी मशागत सुरू केली आहे.

खरीप हंगामातील पीक विम्याची अग्रिम रक्कम अद्यापही जमा न झाल्यामुळे दुबार पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करावी लागत आहे. पावसामुळे बहरलेले तुरीचे पीक जमीनदोस्त झाले. ढगाळ वातावरण, धुक्यामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला. हे महसूल कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना चांगल्या प्रकारे अवगत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT