Prataprao Jadhav and Raksha Khadse Agrowon
ॲग्रो विशेष

Union Cabinet : बुलडाणा जिल्ह्याला केंद्रात मंत्रिपदाची दुहेरी लॉटरी

Ministerial Positions : नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात बुलडाणा जिल्ह्याची लाॅटरी लागली आहे. या जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली असून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव व रावेरच्या खासदार रक्षा खडसे हे दोघे या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात करणार आहेत.

Team Agrowon

Buldhana News : नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात बुलडाणा जिल्ह्याची लाॅटरी लागली आहे. या जिल्ह्याला दोन मंत्रिपदे मिळाली असून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव व रावेरच्या खासदार रक्षा खडसे हे दोघे या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व मंत्रिमंडळात करणार आहेत. एकावेळी दोन खाती मिळाल्याने किमान आता तरी या अविकसित जिल्ह्याचा शिक्का पुसला जाईल, अशी अपेक्षा सामान्य जनता करीत आहे.

बुलडाणा लोकसभा मतदार संघात प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा विजयी झालेले आहेत. तर रावेरमधून रक्षा खडसे विजयी झाल्या होत्या. रावेर मतदार संघात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघ मोडतो. त्यामुळे या जिल्ह्याला आता दोन महत्त्वाची पदे मिळाली. जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या व्यक्तीला केंद्रामध्ये पहिल्यांदाच मंत्री होण्याची संधी मिळालेली आहे.

१९८६ मध्ये शिवसेनेतून जाधव यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात मेहकर तालुक्यांमध्ये शिवसेनेची स्थापना करून संघटन बांधणी केली. १९८६ मध्ये तालुका संघटक, १९८८ मध्ये तालुकाप्रमुख, १९९० पासून जिल्हा शिवसेनाप्रमुख म्हणून त्यांनी संघटनेतही काम केले. यापूर्वी बुलडाण्याचे खासदार म्हणून मुकुल वासनिक व शिवसेनेचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांना संधी मिळाली होती. मात्र, हे दोघेही बाहेरील रहिवासी होते. बुलडाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून प्रथमच जाधव मंत्री झाले.

तीन वेळा आमदार, चौथ्यांदा खासदार

जाधव यांचा राजकीय आलेख सातत्याने वाढता आहे. १९९५ मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले. १९९७ ते १९९८ या काळात क्रीडा व पाटबंधारे राज्यमंत्री होते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले. १९९९ आणि २००४ मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले. मेहकर मतदार संघ राखीव झाल्यानंतर ते २००९ मध्ये लोकसभेवर गेले. त्यानंतर २०१४, २०१९, २०२४ असे सलग चार वेळा खासदार झाले. २०१९ ते २०२२ या काळात ते ग्रामविकास व पंचायत राज समितीचे अध्यक्षही होते. शिवसेना फुटीच्या काळात त्यांनी एकनाथ शिंदेंना सहकार्य केले. आता शिंदे गटाच्या कोट्यातून जाधव यांना संधी देण्यात आली.

रक्षा खडसेही मंत्री

रावेर लोकसभा मतदार संघात विजयाची हॅटट्रिक साधणाऱ्या खा. रक्षा खडसे यांनाही मंत्रिपद मिळाले. या मतदार संघात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा तालुके मोडतात. त्या मंत्री झाल्याने आता बुलडाणा जिल्ह्यातील जनतेला दोन मंत्री मिळाले आहेत.

विकासाची आशा

एकाचवेळी दोन मंत्रिपदे मिळाल्याने विकासापासून कोसो दूर असलेल्या विदर्भ-मराठवाडा-खानदेश सीमेवरील बुलडाणा जिल्ह्याला लहान, मोठे उद्योगधंदे येतील अशी अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

Satana APMC: सटाणा बाजार समितीमध्ये भरती रद्द करण्याच्या हालचाली

Farmers Protest: बारदानाअभावी गहू खरेदी ठप्प, दोन दिवस रांगेत उभ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; कापसातील वाढ कायम, कलिंगडाची आवक टिकून, मोहरीच्या भावात तेजी तर कांदा दबावातच

Farm Road Opens: अतिक्रमणमुक्ती मोहिमेत पाणंद-शेतरस्ते खुले

SCROLL FOR NEXT