Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : पीकविमा,अनुदानाचा निधी खात्यातून वळती करू नका : रविकांत तुपकर

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची मागणी तुपकरांनी केली आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा ः सध्या राज्यभरातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात पिचल्या जात आहे. अशातच आता राष्ट्रीयीकृत बँका देखील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्या आहेत. या बँकांनी पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा सपाटा लावला आहे. खाते होल्ड केले जात आहेत.

कृपया हे थांबवा अन्यथा बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू,’’ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीयकृत बँकांना कडक समज देण्याची मागणी देखील तुपकरांनी केली आहे.

रब्बीमध्ये अवकाळी पाऊस व चक्रीवादळामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कोणत्याच शेतमालाला भाव नाही. भाव नसल्याने जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त शेतमाल शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत.

राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या या रकमांना होल्ड लावत आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची बँक अधिकाऱ्यांकडून पिळवणूक केली जात आहे. पीकविमा, अनुदानाच्या रकमांना परस्पर होल्ड लाऊ नये, अशी मागणी तुपकरांनी केली आहे.

‘तर संघर्ष होईल’

जर बँकांकडून असेच चालू राहिले तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभे राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळावेत यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना कडक समज देण्याची आपल्या स्तरावरून तातडीने योग्य कार्यवाही करावी, अन्यथा संघर्ष होईल, असा कडक इशाराही त्यांनी दिला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांचे पीकविमा, अतिवृष्टी अनुदान, ठिंबक अनुदान व शेतमाल विक्रीचे पैसे परस्पर कर्ज खात्यात वळती केल्यास संबंधित बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करून बँक अधिकाऱ्यांना धडा शिकवल्या जाईल असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT