Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Linking Fertilizer : लिंकिंग खताची सक्ती नको

Fertilizer Price Update : खतांच्या किमतीत झालेली भरमसाट दरवाढ तसेच मशागतींच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे.

Team Agrowon

Kolhapur Fertilizer News : खतांच्या किमतीत झालेली भरमसाट दरवाढ तसेच मशागतींच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. शेतीपिके तोट्यात गेल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.

असे असताना खासगी खत कंपन्यांकडून कृषी सेवा केंद्रांमधून युरिया व इतर काही खतांबरोबर लिंकिंग व इतर काही दुय्यम खते माथी मारली जात असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांना युरिया खताची गरज असते. सध्या सर्वत्र उसाच्या भरणीसह इतर कामांची धांदल सुरू आहे. शेतकरी कृषी केंद्रात जाऊन खतासाठी विचारणा केली जात आहे.

पण, युरिया उपलब्ध नाही किंवा इतर खतांच्या गोण्या किंवा कीटकनाशके घेण्याबाबत शेतकऱ्यांना सक्ती केली जाते. खरंतर शेतकऱ्यांना फक्त युरियाची गरज असते. खत कंपन्यांच्या मनमानीमुळे इतर खते शेतकऱ्यांवर लादण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीवर शासनाने चाप लावण्याची गरज आहे.

खरिपासाठी व रब्बी शेती पिकांच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर युरिया खताची गरज असते. खोडवा भरणीची कामे जोरात सुरू असून शेतकरी वर्गातून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.

मात्र, युरिया खताची गोणी हवी असेल तर त्यासोबत लिंकिंगद्वारे अन्य खते माथी मारली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

उत्पादन खर्च वाढल्याने मोबदल्यात घट झाली आहे. त्यातच लिंकिंग देऊन खतनिर्मिती कंपन्या नको असणारी खते व इतर कीटकनाशके माथी मारत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अशा कंपन्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
अमर मिटके, शेतकरी, दारवाड
कृषी सेवा केंद्र चालकांनी खताच्या विक्रीबरोबर लिंकिगची सक्ती करू नये तसेच अशा प्रकारचे लिंकिंग होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून तक्रार द्यावी. संबधित कृषी सेवा केंद्र चालकावर योग्य ती कारवाई केली जाईल.
किरण पाटील, तालुका कृषी अधिकारी, भुदरगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT