Buldana Election News Agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Election News : निवडणूक खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

जिल्ह्यात सन २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण २९२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या.

Team Agrowon

Buldana News : ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक (Grampanchyat Election) लढलेल्या व वेळेत निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या सुमारे ६९० जणावर गंडांतर आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पी. तुम्मोड (Collector Dr. h. P. Tummod) यांनी याबाबत नुकताच आदेश पारीत केला असून या उमेदवारांना आता पुढील पाच वर्षे कुठलीही निवडणूकसुद्धा लढवता येणार नाही. या निर्णयाने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात सन २०२२ मध्ये जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण २९२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या.

या ग्रामपंचायतीमध्ये ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष निवडणूक लढविलेली अशा उमेदवारांनी निवडणूक खर्च ३० दिवसांमध्ये सादर करणे बंधनकारक होते. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीमध्ये एकूण ६९० उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च प्रशासनाकडे सादर केला नाही.

यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी २४ फेब्रुवारीला काढलेल्या आदेशानुसार या दिनांकापासुन पुढील पाच वर्षांच्या कालावधीकरिता ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून राहण्यास किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यासाठी संबंधितांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

यामध्ये सर्वाधिक १४६ सदस्य हे लोणार तालुक्यातील आहेत. यानंतर सिंदखेडराजामध्ये १३३ सदस्यांचा समावेश आहे.

बुलडाणा तालुक्यात ५६, चिखली २७, देऊळगावराजा ६५, मेहकर ६९, जळगाव जामोद १३, संग्रामपूर ३९, नांदुरा ४९, मोताळा २८, मलकापूर १६, खामगाव ४३ आणि सर्वात

कमी ६ सदस्य हे शेगाव तालुक्यातील आहेत. अशा प्रकारे ६९० सदस्यांचे पद निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न केल्याने गेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT