IAS Dilip Swami Agrowon
ॲग्रो विशेष

Collector Review : जलसंधारण कामे आणि निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

IAS Dilip Swami : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी (ता. १०) कन्नड तालुक्यास भेट देऊन जलसंधारण उपाययोजना, कामे व निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी रविवारी (ता. १०) कन्नड तालुक्यास भेट देऊन जलसंधारण उपाययोजना, कामे व निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) प्रभोदय मुळे, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, तहसीलदार कन्नड विद्याचरण कडवकर, नायब तहसीलदार मनोज बारवाल, आदी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी हतनूर येथे रोहयो अंतर्गत विहीर पुनर्भरण कार्यक्रम तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीकडे या संकल्पनेतून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने विकसित केलेले जलतारा स्ट्रक्चरचे उद्घाटन केले.

मग्रारोहयो अंतर्गत राज्यात प्रथमच जलतारा स्ट्रक्चरचे काम कन्नड तालुक्यात करण्यात येत आहे. त्यामुळे मोठा पाऊस पडल्यावर पाण्याचा लगेच निचरा होतो. भूगर्भात पाणी पातळी वाढते. तसेच कृषिभूषण संतोष जाधव यांचे शेतास भेट देऊन पाहणी केली.

निवडणूक विषयक पूर्वतयारीचा आढावा घेतांना त्यांनी हतनूर येथील मतदान केंद्रास भेट दिली. तसेच तहसिल कार्यालय कन्नड येथे लोकसभा निवडणूक - २०२४ संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवणेसाठी करावयाची जनजागृती, दिव्यांग मतदारांना रॅम्प व्हील चेअर, पोस्टल मतदान आदी सुविधा पुरविणे, मतदान केंद्रावर पाळणाघर व इतर सुविधा पुरविण्याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्याबाबत सूचना दिल्या.

कन्नड शहरातील सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे भेट देऊन तेथील मतदान केंद्र, शिवाजी महाराज महाविद्यालय कन्नड येथील नियोजित ईव्हीएम स्ट्रॉग रूम पाहणी, साहित्य वाटप स्वीकृती स्थळ पाहणी केली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीपर उपाययोजना राबवाव्यात.

तसेच कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोनातून प्रतिबंधात्मक उपययोजनाबाबत सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय कन्नड येथे भेट देऊन ई-ऑफीसद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून कार्यप्रणालीची सुरवात केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT