Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : कृषी विभागातील गैरव्यवहाराची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

Agriculture Subsidy Scam : मुखेड तालुक्यातील सूक्ष्मसिंचन संच गैरव्यवहारात गुन्हे दाखल झालेल्या दोन कृषी पर्यवेक्षानी बनावट पावत्या बनवून ३२ लाख रुपयांचे मळणी यंत्र अनुदान लाटण्याचा प्रकार उघड झाल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झाले होते.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : मुखेड तालुक्यातील सूक्ष्मसिंचन संच गैरव्यवहारात गुन्हे दाखल झालेल्या दोन कृषी पर्यवेक्षानी बनावट पावत्या बनवून ३२ लाख रुपयांचे मळणी यंत्र अनुदान लाटण्याचा प्रकार उघड झाल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रकाशित झाले होते.

या प्रकरणाची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दखल घेऊन याबाबतच चौकशी अहवाल मागविला आहे. तसेच आजपर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती घेतली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातल्याने कृषी विभागातील गैरव्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सूक्ष्मसिंचन गैरव्यवहारात गुन्हे दाखल झालेले मुखेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील तत्कालीन कृषी पर्यवेक्षकांनी पर्यवेक्षकांनी बनावट पावत्या तयार करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशी अहवालात उघडकीस आले होते. याबाबत १४ महिन्यापूर्वी तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी याबाबत लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे संबधिताविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत अहवाल पाठविला होता.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तत्कालीन कृषी पर्यवेक्षक एस. डी. बनसोडे आणि एस. व्ही. दबडे यांनी बनावट पावत्यांद्वारे शेतकऱ्यांच्या नावावर अनुदानाचा प्रस्ताव तयार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार केला होता. ही यंत्रे प्रत्यक्षात वितरित न करता बनावट यादी, फोटो, बनावट ऑनलाइन रक्कम जमा केलेल्या पावत्या आदी बनावट दस्तावेज तयार करण्यात आले होते.

या प्रकारामुळे शासनाचे ३२ लाख रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात ॲग्रोवनमध्ये (ता. १५) एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कृषी विभागाला तातडीने चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

यासोबतच आजपर्यंत या प्रकरणात काय कार्यवाही करण्यात आली, याचीही माहिती घेऊन विभागीय कृषी सहसंचालकाकडून अधिक माहिती घेणार असल्याची कळाले आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घातल्यामुळे गैरव्यवहार करणाऱ्यांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT