District Bank Agrowon
ॲग्रो विशेष

District Bank : राष्ट्रीय फोरमसाठी जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा : सतीश मराठे

देशातील सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमनात व नियंत्रणात आणल्या आहेत.

Team Agrowon

Satish Marathe : अपेक्षित व अनपेक्षित तोटा भरून काढण्यासाठी बॅंकांनी आपला स्वनिधी वाढविला पाहिजे. सहकारी बँकिंग (Cooperative Bank) क्षेत्रात सातारा, पुणे, रायगड, अकोला आदी बँका चांगल्या कामकाज करीत असून, राष्ट्रीय पातळीवर जिल्हा बँकांचे फोरम असणे गरजेचे आहे.

त्यासाठी सातारा जिल्हा बँकेने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे संचालक व सहकार भारतीचे अध्यक्ष सतीश मराठे यांनी केले.

देशातील सर्व सहकारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमनात व नियंत्रणात आणल्या आहेत. याबाबत सहकारी बँकांमध्ये संभ्रमावस्था असून, ती दूर होण्यासाठी सातारा जिल्हा बँकेने राज्यातील सर्व जिल्हा बँका व जिल्ह्यातील नागरी सहकारी बँका, विकास सोसायट्यांचे पदाधिकारी, अधिकारी यांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजिली होती.

कार्यशाळेचा प्रारंभ श्री. मराठे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. या वेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, संचालक प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, राजेंद्र राजपुरे, सुनील खत्री, सत्यजित पाटणकर, शिवरूपराजे खर्डेकर आदी उपस्थित होते.

श्री. मराठे म्हणाले, ‘‘संस्था चालविण्याची पद्धती व व्यवस्थापनामध्ये शिस्त आणून नियंत्रक व नियमकाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन व्हावे, या हेतूने बँकिंग रेग्युलेशन अॅक्टमध्ये सुधारणा करून तो सहकारी बँकांना लागू केला आहे. केंद्र शासनाने समिती गठित केली असून, राज्याच्या आकारानुसार त्रिस्तरीय किंवा द्विस्तरीय पतसंरचना ठेवण्याबाबत शिफारस केली आहे.’’

या वेळी रामराजे नाईक निंबाळकर प्रा. दिगंबर दुर्गाडे, रायगड जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह पुणे, रायगड, यवतमाळ, गडचिरोली आदी जिल्हा बँकांचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री. देसाई यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT