Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Market Committee : जळगाव बाजार समितीत जिल्हा बँकेचा पॅटर्न शक्य

Market Committee : महाविकास आघाडीला जळगाव बाजार समितीत सत्ता मिळाली. पण आता सभापतिपद आपल्यालाच प्रथम हवे, यासाठी स्पर्धा वाढली आहे. आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.

Team Agrowon

Market Committee Jalgaon : महाविकास आघाडीला जळगाव बाजार समितीत सत्ता मिळाली. पण आता सभापतिपद आपल्यालाच प्रथम हवे, यासाठी स्पर्धा वाढली आहे. आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.

यातच आघाडीचे दोन संचालक ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांना भेटल्याची चर्चा आहे. जळगाव जिल्हा बँकेत सेना (शिंदे गट) व भाजपने बहुमत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून आपल्या मर्जीतला संचालक अध्यक्षपदी निवडून आणला. हाच पॅटर्न जळगाव बाजार समितीतही आणला जाईल, अशी चर्चा आहे.

येत्या शनिवारी (ता. २०) बाजार समितीत सभापतींची निवड होईल. आघाडीचे ११ संचालक निवडून आले आहेत. तर भाजप - सेनेचे सहा संचालक आहेत. युतीकडे बहुमत नाही.

आघाडीत सभापतिपदासाठी लक्ष्मण पाटील यांच्यासह सुनील महादन, श्यामकांत सोनवणे, मनोज चौधरी यांच्या नावाची चर्चा होती. प्रत्येकाला एक वर्ष सभापतिपद दिले जाईल, असा फॉर्म्यूला आघाडीत चर्चेत होता. त्यात आता आघाडीत फुटीची चर्चा सुरू झाली आहे.

संचालकांना सहलीला नेण्याची तयारी

दोन संचालकांनी मागील आठवड्यात महाजन यांची भेट घेतली. त्यात काय चर्चा झाली हे समजू शकले नाही. परंतु बाजार समितीत सभापती निवडीबाबत ही भेट होती, असा कयास लावला जात आहे. यामुळे आघाडीत खळबळ उडाली आहे. संचालकांना सभापती निवडीपूर्वी एकत्र करून सहलीला परराज्यांत नेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT