Agricultural Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Festival : हिंगोलीत २५ ते २८ मार्च दरम्यान जिल्हा कृषी महोत्सव

हळदीच्या क्षेत्रात राज्यात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळख आहे. शेतकऱ्यांच्या हळदीसह इतर कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य पिकांनाही शाश्वत बाजार भाव मिळावा.

Team Agrowon

Hingoli News : कृषी विभागातर्फे हिंगोली जिल्हा कृषी महोत्सवाचे (Hingoli Agriculture Festival) आयोजन शनिवार (ता. २५) ते मंगळवार (ता. २८) या कालावधीत हिंगोली येथील रामलिला मैदानावर करण्यात आले आहे.

हळदीच्या क्षेत्रात राज्यात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळख आहे. शेतकऱ्यांच्या हळदीसह इतर कडधान्य, गळीतधान्य व तृणधान्य पिकांनाही शाश्वत बाजार भाव मिळावा.

शेतमाल उद्योग प्रक्रियेला चालना मिळावी. शेतकरी, राज्य पातळीवरील व विद्यापीठातील नामांकित वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ यांच्यामध्ये थेट संवाद व्हावा म्हणून कृषी विभागातर्फे संकल्पनेतून हिंगोली येथे जिल्हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवामध्ये कृषी निविष्ठा, सिंचन साधने, गृहपयोगी विक्री दालन, यंत्र, अवजारे, कृषी विज्ञान केंद्र, हळदीवर प्रक्रिया उद्योग समुहांचा दोनशेहून अधिक दालनांचा सहभाग असेल. चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना तृणधान्य, कडधान्ये, गळीतधान्ये पिकांचे लागवड ते काढणीचे तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान, उद्योगातील संधी व आव्हाने, हळद मूल्यवर्धन साखळी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्पादन बाजारभाव, भौगोलिक मानांकन, जगातील आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य (मिलेट) वर्ष याबाबत विविध विषयावर माहिती दिली जाणार आहे.

शेतमालाचे मूल्यवर्धन, उत्पादक ते खरेदीदार संमेलन, जिल्ह्यातील नवीन पिके ड्रॅगन फ्रूट, करवंद यांचे लागवड तंत्रज्ञान यावर तज्ज्ञ शेतकऱ्यांना माहिती देतील.या महोत्सवात यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT