Agriculture Mechanization  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

Dhananjay Munde : येथील सामाजिक न्याय भवन परिसरात कृषी विभागातर्फे देण्यात आलेला कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप नुकतेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

Team Agrowon

Beed News : येथील सामाजिक न्याय भवन परिसरात कृषी विभागातर्फे देण्यात आलेला कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे वाटप नुकतेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी. के जेजूरकर प्रमुख उपस्थिती होती.

श्री मुंडे म्हणाले, की मिळालेले ट्रॅक्टर केवळ आपल्यापुरते मर्यादित न वापरता आपले काम झाल्यावर इतर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल अशा माफक शुल्कावर उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

बीड जिल्ह्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२३ - २४ मध्ये, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेमध्ये २४५ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत १६२ शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. यासाठी ६५.४० लाख रुपयांच्या निधी निधी खर्च करण्यात आला. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये अनुदान वितरणासाठी ३ कोटी १७ लाख ७९ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला. याचा लाभ ५२६ शेतकऱ्यांनी घेतला.

असे एकूण ५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी बीड जिल्ह्यास मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील ९३३ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेळेवर व मजुरांच्या तुलनेत कमी खर्चात होतील.

यामध्ये पिक पेरणीपूर्व मशागत, काडणी व मळणी, फवारणी, आंतरमशागत करणे. नियोजनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क करून यांत्रिकीकरण योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT