Tribal Farmers  Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Farmers : आदिवासी शेतकऱ्यांना सुरक्षा साधनांचे वितरण

Hirda Production : आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर तालुक्यांत बाळहिरड्याचे दरवर्षी ८ ते १० हजार टन उत्पादन होते.

Team Agrowon

Pune News : ‘‘आदिवासी भागातील शेतकऱ्यांना हिरडा काढताना झाडावरून पडून अपघात होऊ नये, शेतकऱ्यांना संरक्षण मिळावे, या उद्देशाने शाश्‍वत ट्रस्ट आणि टाटा मोटर्स यांच्या आर्थिक सहकार्याने सुरक्षा साधनांचे वितरण केले,’’ अशी माहिती शाश्‍वत ट्रस्टचे अध्यक्ष बुधाजी डामसे यांनी दिली.

आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, भोर तालुक्यांत बाळहिरड्याचे दरवर्षी ८ ते १० हजार टन उत्पादन होते. आदिवासी शेतकरी दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात हिरडा काढण्याच्या लगबगीत असतात. हिरड्याची झाडे २० ते ३० फूट उंच असतात. त्यामुळे हिरडा काढताना शेतकरी पडून गंभीर जखमी होण्याबरोबरच मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडतात. या घटना टाळण्यासाठी सुरक्षा पट्ट्यांचे वितरण करण्यात आले आहे.

टाटा मोटर्सचे रोहित सरोज, सामाजिक दायित्व निधी प्रमुख लित्तेश आत्तरडे यांनी या विषयाचा गांभीर्याने विचार करत आंबेगाव तालुक्यातील कोंढरे, असाणे येथे जाऊन शेतकऱ्यांना सुरक्षा पट्ट्यांचा वापर कसा करायचा याबाबतचे प्रशिक्षण देऊन कोंढरे, कुशिरे, भोईरवाडी,

काळवाडी, पंचाळे, माळीण, मेनुंबरवाडी, अडिवरे, असाणे, न्हावेड आदी गावांमधील २५० कुटुंबांना त्यांचे वितरण केले. या प्रसंगी नारायण भोकटे, विजय चिमटे, शंकर धराडे, पुष्पा शेळके, किसन मोरे, प्रवीण जढर, शंकर भोईर आदी शेतकरी उपस्थित होते.

हिरडा काढताना सुरक्षा पट्ट्यांचा वापर खूप गरजेचा होता. तो मिळाल्याने आम्ही सुरक्षित झालो आहोत. हिरडा झोडताना आमच्या मनात आता भीती राहणार नाही व कोणतीही दुर्घटना घडणार नाही.
- मधुकर शेळके, कोंढरे, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market Update: खरीप लाल कांद्याच्या आवकेत ७५ टक्के घट

Agricoss Day: डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ डिसेंबरला राज्य अॅग्रीकॉस दिन

Fruit Crop Insurance Issue: फळ पीकविमा योजनेबाबत केळीविमाधारक संभ्रमात

Water Shortage: हिवरेबाजारच्या शिवारात यंदा सव्वा आठ कोटी लिटर पाण्याची तूट

Maharashtra MLC Election Voting: तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांत मतदान सुरु, १८२ उमेदवार रिंगणात, मतदारयादीत नाव कसे शोधावे?

SCROLL FOR NEXT